मनसे प्रमुख राज ठाकरे एकनाथ शिंदेंच्या घरी; राजकीय वर्तुळात खळबळ|VIDEO

image

महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे यांनी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. ठाणे येथील नंदनवन बंगल्यावर एकनाथ शिंदेंची भेट घेतली. महापालिका निवडणुकीनंतर राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांची ही पहिलीची भेट होती. ठाकरे बंधु एकत्र आल्यानंतर राज आणि उद्धव ठाकरे या दोघांनीही शिंदे यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले होते. मात्र निकाल लागल्यानंतर कल्याण डोंबिवली आणि नाशिकमध्ये मनसेने शिंदे गटाला पाठिंबा देत सत्तेत स्थापन होण्याचा निर्णय घेतल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती. अशातच आज शिंदे आणि ठाकरेंच्या भेटीने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. मात्र या दोघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली हे अद्याप कळू शकले नाही.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *