मनसेचं ठरलं! ३ मे रोजी वाजणार ‘भोंगा’; पत्रकार परिषदेत केली घोषणा

मशिदींवरचे अजानचे भोंगे काढले नाहीत तर आम्ही त्यासमोर दुप्पट आवाजात हनुमान चालिसा लावू अशा आशयाचं विधान मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या गुढीपाडव्या दिवशीच्या सभेत केलं आणि महाराष्ट्रातल्या राजकारणात खळबळ माजली. हे भोंगे हटवण्यासाठी राज ठाकरेंनी ३ मे पर्यंतचा अल्टिमेटमही दिला होता. त्यामुळे ३ मे रोजी होणार काय, याकडे राज्याचं लक्ष आहे. त्याबद्दलच आज पत्रकार परिषद घेत मनसेने माहिती दिली आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी सकाळीच ट्वीट करत वातावरण निर्मिती केली होती. आज सकाळी ११ वाजता पत्रकार परिषदेत मोठी घोषणा..मोठ्ठा 'आवाज' होणार आहे, असं ट्वीट त्यांनी केलं होतं. आता हा कोणता आवाज असेल याचा खुलासा झाला आहे.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *