भावनिक आवाहन, कोपरखळ्या मारत नगरसेवकांनी घेतला निरोप

पुणे : गेल्या पाच वर्ष एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आंदोलनाच्या माध्यमातून एकमेकांवर तुटून पडणारे नगरसेवक आज मात्र अखेरच्या निरोपाच्या मुख्य सभेत एकमेकांना केलेल्या मदतीची आठवणी सांगत, कोपरखळ्या मारत, काम करताना घडलेल्या गमतीशीर गोष्टींना उजाळा देत शेरोशायरी म्हणत निरोप दिला. तर काही नगरसेविकांना निरोपाचे भाषण करताना अश्रू अनावर झाले. पुणे महापालिकेच्या नगरसेवकांची मुदत आज संपली, त्यामुळे निरोपाची अनौपचारिक मुख्यसभा आयोजित करण्यात आली होती. गोपाळ चिंतल यांनी महापालिकेच्या गेल्या अनेक वर्षांपासूनच्या सभागृहातील आठवणी सांगितल्या. ८० कोटी ते आठ हजार कोटी असा बजेटचा प्रवास पाहिला आहे. अनेक बाबी संग्रही करून ठेवण्यासारख्या आहेत, असे चिंतल यांनी सांगिले. ज्योत्स्ना एकबोटे यांनी मी प्राध्यापक म्हणून काम करताना चुकून नगरसेवक होऊन राजकारणात. अनेक गोष्टी शिकता आल्या. मुक्ता जगताप म्हणाल्या, " गृहिणी म्हणून काम करताना निवडणूक लढवली आणि थेट नगरसेविका म्हणून सभागृहात आले महापालिकेत नेमके कसे काम करतो मला काही माहिती नव्हते पण शहर सुधारणा महिला बालकल्याण समिती म्हणून काम करताना अनेक गोष्टी शिकण्यास मिळाल्या ज्येष्ठ नगरसेवकांनी मार्गदर्शन केले.


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply