भगत सिंह कोश्यारी यांच्या विरोधात राजकीय वातारवरण तापलं; शिवसेनेचा ठाकरे गट 'राज्यपाल चले जाओ' आंदोलन करणार

राज्यापाल भगत सिंह कोश्यारी यांच्या विरोधात शिवसेनेचा ठाकरे गटाने आणखी आक्रमक भूमिका घेतली आहे. राज्यपाल कोश्यारी यांच्याकडून सातत्याने वादग्रस्त वक्तव्य करण्यात येत असल्यामुळे शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून 'राज्यपाल चले जाओ' आंदोलन करण्यात येणार आहे. 

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर केलेल्या वक्तव्यावरून राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. सत्ताधारी आणि विरोधकांकडून राज्यपालांच्या वक्तव्याचा निषेध केला जात आहे. तसेच विरोधी पक्षाकडून राज्यपालांना पदावरून हटविण्याची मागणी केली जात आहे.

राज्यपालांनी वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर त्यांना दिल्लीतून देखील बोलावणं आलं होतं. त्यानंतर राज्यपालांना त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर केलंलं वादग्रस्त वक्तव्य भोवणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. याचदरम्यान, शिवसेनेचा ठाकरे गट राज्यपालांच्या विरोधात आणखी आक्रमक होणर आहे.

राज्यात राज्यपालांकडून वारंवार आक्षेपार्ह वक्तव्य केली जात आहेत. त्यामुळे काही दिवसांपूर्वी राज्यात त्यांच्या विरोधात आक्रमक आंदोलने झाली. त्यानंतरही राज्यपालांच्या वक्तव्यावरून झालेला वाद थांबायचा नाव घेईना. राज्यपालांच्या विरोधात आणखी आक्रमक होत शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून 'राज्यपाल चले जाओ' आंदोलन करण्यात येणार आहे. 'राज्यपाल चले जाओ' आंदोलनानंतर राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांना पदावरून हटविण्यात येणार का, हे पाहावे लागणर आहे.

 


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply