फुटबॉलच्या इतिहासातील काळरात्र; इंडोनेशियात फुटबॉल सामन्यादरम्यान हिंसाचार, १२७ जणांचा मृत्यू

Indonesia Football Match Violence: इंडोनेशियामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शनिवारी रात्री फुटबॉल सामन्यादरम्यान (Football Match) झालेल्या हिंसाचारात जवळपास 127 नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. मृतांमध्ये लहान मुलांसह पोलिस (Police) अधिकाऱ्यांचा देखील समावेश आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, इंडोनेशियातील कंजुरुहान स्टेडियममध्ये फुटबॉल सामना झाला. यावेळी अरेमा फुटबॉल क्लबचा त्यांचा कट्टर-प्रतिस्पर्धी समजल्या जाणाऱ्या पर्सेबायाकडून पराभव झाल्याने पर्सेबायाच्या समर्थकांनी मोठ्या फुटबॉलच्या मैदानामध्येच प्रतिस्पर्धी संघाच्या समर्थकांवर हल्ला करत मोठा गोंधळ घातला.

यामध्ये त्यांनी मैदानात जात हुल्लडबाजी केली. त्यामुळे दोन्हीकडूल गटामंध्ये मोठ्या प्रमाणात उसळलेल्यया हिंसाचारामध्ये 100 हून अधिक फुटबॉल चाहते आणि दोन पोलिस अधिकाऱ्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला असल्याचं दैनिक स्टारने सांगितलं आहे.

तर या हिंसाचाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. शिवाय या दंगलीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांना लाठीमार करत अश्रुधुराच्या नळकांड्या सोडाल्याचं देखील व्हिडीओमध्ये दिसत आहे. दरम्यान पोलिसांनी आक्रमक पवित्रा घेतल्यावर दंगेघोर पळताना देखील व्हिडीओमध्ये दिसत आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply