पूर्वांचल द्रुतगती मार्गावर दोन बसचा भीषण अपघात; ८ ठार तर २० जण जखमी

उत्तर प्रदेशातील बाराबंकी येथील पूर्वांचल द्रुतगती मार्गावर दोन बसमध्ये भीषण अपघात झाला आहे. या अपघातात ८ जणांचा मृत्यू झाला असून २० जण जखमी झाले आहेत. सीतामढीहून दिल्लीला जाणाऱ्या डबल डेकर बसला दुसऱ्या बसने धडक दिली. ही धडक इतकी जोरात होती की बसचे मोठे नुकसान झाले असून अनेक प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. जखमींपैकी तिघांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना लखनऊमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पोलीस उपनिरिक्षक मनोज पांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, एक डबल डेकर बस (UP 17 AT 1353) बिहारच्या सीतामढी जिल्ह्यातील पुपरी शहरातून रविवारी दिल्लीला निघाली होती. बाराबंकी जिल्ह्यातील पूर्वांचल द्रुतगती मार्गावरील नरेंद्रपूर मद्राहा गावाजवळ सोमवारी पहाटे ४ वाजता बस थांबवण्यात आली. बसमधील प्रवासी उपेडाच्या कॅन्टीनमध्ये चहा-नाष्टा करत होते. अर्ध्या तासानंतर पहाटे ४.५० वाजता भरधाव वेगाने येणाऱ्या दुसऱ्या बसने डबलडेकर बसला मागून धडक दिली. ही धडक इतकी जोरात होती की बसमधील अनेक प्रवाशांचा जागीत मृत्यू झाला.

अपघातानंतर उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांचे ट्वीट
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्य नाथ य़ांनी या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या प्रवाशांबाबत दु:ख व्यक्त केले आहे. आदित्य नाथ यांनी ट्वीट करत जखमींना तातडीने मदत करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply