पुणे : पुणे शहरात सोमवारी रात्री ढगफुटीसदृश पावसाने हाहाकार उडवून दिला. सर्व रस्ते पाण्याखाली गेले, अनेक घरे, सोसायट्यांमध्ये पाणी शिरले. झाडे, फांद्या आणि भिंती कोसळण्याच्या घटनाही घडल्या. रात्री घराबाहेर असलेले अनेक नागरिक ठिकठिकाणी अडकून पडले. विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह झालेल्या या धुवाधार पावसाने पुणेकरांमध्ये अक्षरश: धडकी भरवली. रात्री साडेनऊच्या सुमारास सुरू झालेला पाऊस रात्री बारापर्यंत कायम होता. शहरासह जिल्ह्यातही बहुतांश भागांत मुसळधार पाऊस झाला. शिवाजीनगर केंद्रावर रात्री अकरापर्यंत ८१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.
शहरात रविवारी रात्री आणि सोमवारी सकाळी हलका पाऊस झाला होता. दुपारी मात्र पावसाचे कोणतेही चिन्ह नव्हते. संध्याकाळी ढगाळ स्थिती निर्माण झाली. रात्री साडेआठच्या सुमारास पावसाचा शिडकावा सुरू झाला. या काळात शहर आणि परिसरात आकाशामध्ये मोठ्या प्रमाणावर ढग निर्माण झाले. पुणे वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार शहरावर सुमारे ७ ते ११ किलोमीटर उंचीचे ढग तयार झाले. त्यामुळे साडेनऊनंतर मात्र पावसाने जोर धरला. दहाच्या सुमारास विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस सुरू झाला.
रात्री बारापर्यंत पावसाचा जोर कायम होता. पाऊस सुरू झाल्यानंतर काही वेळांतच रस्त्यांवर पाण्याचे लोट वाहू लागले. तासाभरात शहरातील जवळपास सर्व रस्ते पाण्याखाली गेले. त्यामुळे दुचाकीच नव्हे, तर चारचाकी वाहनेही रस्त्याने चालविणे कठीण झाल्याने संपूर्ण शहरच ठप्प झाले. पाऊस सुरू होताना घराबाहेर असलेले नागरिक विविध ठिकाणी अडकून पडले. रात्री उशिरापर्यंत पाऊस कायम असल्याने नागरिकांचे प्रचंड हाल झाले. सुमारे दोन तास झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक घरे आणि सोसायट्यांमध्ये पाणी शिरले. काही भागांत भिंती कोसळण्याचेही प्रकार झाले. त्यामुळे नागरिकांचे हाल झाले. शहराच्या विविध भागांत झाडे आणि फांद्या कोसळण्याचे प्रकार झाले. शहराच्या विविध भागांतून अग्निशमन केंद्रांत दूरध्वनी येत होते. रात्री बारानंतरही पाऊस कायम होता. अरबी समुद्रातून येणारे मोठ्या प्रमाणावरील बाष्प आणि स्थानिक स्थितीमुळे शहरात पावसाचा जोर वाढला. कमी वेळेत अधिक तीव्रता आणि मोठ्या कालावधीतील हा शहरातील या हंगामातील पहिला पाऊस ठरला. शहर आणि परिसरात आणखी दोन दिवस पावसाची शक्यता आहे
शहर
- Cidco Lottery : सिडकोचा मोठा निर्णय! घरासाठी अर्ज करण्याच्या दोन अटी शिथिल
- Pune : हरवलेल्या बालकाचा चार तासांत शोध; पोलीस आणि सजग महिलेची तत्परता
- Pune : स्वारगेट ते कात्रज मेट्रो प्रकल्पात होणार ‘हा’ बदल! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे केले होते भूमिपूजन
- Pune : कात्रज चौकात आजपासून वाहतूकबदल, उड्डाणपुलाच्या कामानिमित्त पर्यायी मार्ग
महाराष्ट्र
- Parliament Winter Session : संभल हिंसाचारावर विरोधक चर्चेवर ठाम; विरोधी खासदारांचा लोकसभेतून सभात्याग
- Parola Accident : लग्न घरात दुःखाचा डोंगर; दोन कारच्या समोरासमोर धडकेत पती-पत्नीचा मृत्य, ४ जण जखमी
- Cidco Lottery : सिडकोचा मोठा निर्णय! घरासाठी अर्ज करण्याच्या दोन अटी शिथिल
- Maharashtra Politics : गृहमंत्रालयावर एकनाथ शिंदे ठाम, इतर खात्यासाठीही टाकली अट, भाजप काय करणार?
गुन्हा
- Pune : जमिनीच्या वादातून चुलत भावाला मोटारीखाली चिरडण्याचा प्रयत्न, शिरुरमधील केंदूर गावातील घटना
- Pune : गुंतवणुकीच्या आमिषाने ज्येष्ठ नागरिकाची दोन कोटींची फसवणूक, वरद प्राॅपर्टीजच्या संचालकांविरुद्ध गुन्हा
- Pune Crime : पुण्यातील चितळे बंधूंच्या दुकानावर दरोडा; चोरीची घटना CCTV कॅमेऱ्यात कैद
- Pune Crime : दांडेकर पूल परिसरात प्रेमप्रकरणातून तरुणाचा खून, शहरात दोन दिवसात तीन खून
राजकीय
- Maharashtra Politics : विधानसभेपूर्वी मुंबईत काँग्रेसला मोठा धक्का, रवी राजा यांनी भाजपमध्ये केला प्रवेश
- Maharashtra Politics : किशोर जोरगेवार यांचा अखेर भाजपामध्ये प्रवेश, विरोध करणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांनीच केलं स्वागत
- Maharashtra Politics : मुंबई, नांदेडनंतर पुण्यात ठाकरे गटात नाराजी; इच्छुक बंडखोरीच्या तयारीत
- NCP Candidate List : अजित पवारांच्या राष्ट्रवादीची तिसरी यादी जाहीर, नवाब मलिक यांच्या नावाची घोषणा नाहीच
इतर
- Aastad Kale : 'राजन नावाचे क्रिमिनल आहेतच की', मुलाचं नाव जहांगीर ठेवल्यामुळे चिन्मय मांडलेकरच्या ट्रोलिंगवर आस्ताद काळेचं स्पष्ट मत
- Ashok Saraf : नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार अभिनेते अशोक सराफ व रोहिणी हटंगडी यांना जाहीर
- Neena Gupta Interview : 'पैशांसाठी मी तशा भूमिका केल्या, देवाकडे प्रार्थना करायची की...' अभिनेत्रीने स्ट्रगलच्या दिवसांतील मांडली व्यथा
- Munawar Faruqui : 'बिग बॉस १७' विनर मुनव्वर फारुकीची प्रकृती बिघडली, रुग्णालयात उपचार सुरू; नेमकं काय झालं?
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
विडियो गॅलेरी
देश विदेश
- Kolkata : बांगलादेशात शांतिसेना पाठवावी! ममता बॅनर्जी यांची मागणी, पंतप्रधान मोदी यांच्या हस्तक्षेपाची विनंती
- New Delhi : नौदलासाठी राफेल, पाणबुड्यांचा करार लवकरच
- ISKCON च्या ५० हून अधिक सदस्यांना बांगलादेशने भारतात येण्यापासून का रोखलं? जाणून घ्या, सीमेवर नेमकं काय घडलं
- Madhya Pradesh News: दहशतवादविरोधी मशाल रॅलीत मोठी दुर्घटना, ३० जण गंभीर जखमी