पुण्यात धाक नेमका कोणाचा ?; शुल्लक कारणावरून पोलिसांच्या गाडीवर दगडफेक

पुणे शहरात गुन्हेगारांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. अशात आता चक्क पोलिसांच्याच गाडीवर दगडफेक करण्यात आली आहे. रात्री उशिरापर्यंत पान टपरी सुरु का ठेवली याची चौकशी केल्याने दगडफेक केल्याचे समजले आहे. सदर घटनेत आरोंपींविरोदात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील वारजे माळवाडी परिसरात ही घटना घडली आहे. १४ डिसेंबर रोजी वारजे माळवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दगडू हाके हे त्यांच्या एका कर्मचारीबोरबर परिसरात गस्त घालत होते. त्यावेळी त्यांना गणपती माथा येथील रॉयल पान शॉप रात्री उशिरा पर्यंत सुरू असल्याचे दिसून आले. टपरी बंद करा आणि घरी जा असं पोलिसांनी सांगितल्यानंतर गर्दीत असलेल्या आरोपींनी जमाव करून पोलिसांच्या दिशेने दगडफेक केली आणि पळून गेले.
 
या घटनेत सुदैवाने कोणाला दुखापत झाली नाही. पोलिसांनी दिग्विजय ककाराम वाघमारे, व्यंकटेश प्रमोद पिळवणकर, अमोल निलेश पवार, लाल्या खान, आप्पा लोंढे, खंड्या वाघमारे यांच्यासह इतर जनानावर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांच्या वाहनावर दगडफेक केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
 
शहरात कोणताही अनुचित प्रकार घडूनये यासाठी पोलीस नेहमीच गस्त घालत असतात. त्यामुळे शहरात शांतता आणि सुव्यवस्था राखली जाते. मात्र पुण्यातील टवाळ मुलांनी चक्क पोलिसांच्याच गाडीवर दगडफेक केल्याने हा चिंतेचा विषय बनला आहे. या घटेत चौघांना ताब्यात घेतले असून इतर आरोपींचा शोध सुरु आहे.


राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply