पुण्यात डेंग्यूचे थैमान, नियम मोडणाऱ्या ४७० इमारतींना पालिकेची नोटीस

पुणे : गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरात मुसळधार पावसाने धडाका घातला आहे. पावसामुळे शहरात डेंगूच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. गेल्या काही दिवसांपासून पुण्यात डेंगू आणि चिकनगुनियाच्या रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. मागील आठ दिवसात पुण्यात ४० हून अधिक डेंग्यूचे रुग्ण आढळले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पुण्यात डेंगू, चिकनगुनिया आणि कॉलरा या साथीच्या आजारांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याच्या प्रश्न ऐरणीवर आला आहे. याच पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेच्या कीटक प्रतिबंधक विभागाने ४७० इमारतींना नोटीसा धाडल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या सात महिन्यात पुण्यात जवळपास २०० हून अधिक डेंग्यूचे रुग्ण आढळले आहेत. डेंग्यू आटोक्यातआण्यासाठी पुणे महानगरपालिकेने यावर्षी कीटक प्रतिबंधक विभागाने ४७० इमारतींना डेंगी डासाची उत्पत्ती झाल्याप्रकरणी नोटीस बजावली आहे. पावसामुळे मोकळ्या जागेत पाणी साचलं जातं आणि याच साचलेल्या पाण्यात डासांची उत्पत्ती होते.

यामुळे घरात मोकळ्या जागेत, डबक्यात,झाडांच्या कुंडीत,टाक्यांमध्ये पाणी साठवू नका, असे आवाहन महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आलेले आहे, अशी माहिती अतिरिक्त आरोग्य अधिकारी संजीव वावरे यांनी दिली आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply