
पुण्यात कसबा विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी कसब्याचा पूर्व भाग ढवळून निघणार आहे. भाजपा-शिंदे गट युतीचे उमेदवाराच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पूर्व भागातील दुचाकी फेरीला समता भूमी येथून प्रारंभ झाला आहे. कसब्यातील लाल महाल येथे मुख्यमंत्री एकनाश शिंदे यांची दुपारी समारोपाची सभा होणार आहे.
कसबा विधानसभा पोटनिवडणुकीतल्या प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस आहे. संध्याकाळी पाच वाजता प्रचार थांबणार आहे. या पार्श्वभूमीवर प्रचाराला अधिक जोर आला आहे. भाजप उमेदवार हेमंत रासने यांच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पश्चिम कसब्यात फेरी काढली होती. फडणवीस यांनी भाजपाचा परंपरागत मतदार असलेल्या नारायण पेठ, शनिवार पेठ आणि सदाशिव पेठ या प्रमुख पेठांमधून सायंकाळी फेरी काढली होती. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पूर्व भाग ढवळून काढणार आहेत. शिवाजी रस्त्याच्या पलीकडच्या भागात म्हणजे पूर्व कसब्यात मुख्यमंत्र्यांची रॅली आयोजित करण्यात आली आहे. या भागात प्रामुख्याने बहुजन समाजाचा मतदार आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजप-शिंदे गटाचे पदाधिकारी उपस्थित या फेरीला प्रारंभ झाला.
पालखी विठोबा चौक, हमाल तालीम, हिंदमाता चौक, साखळीपीर तालीम,सरळ डोके तालीम, लक्ष्मी रस्ता, अल्पना चित्रपटगृह, कस्तुरे चौक, मोमीनपुरा, शीतलादेवी चौक, फडगेट पोलीस चौक, सेवा मित्र मंडळ,अकरा मारुती मंडळ, चिमण्या गणपती, नागनाथ पार, शगुन चौक, तांबडी जोगेश्वरी, बुधवार चौक, मोती चौक, फडके हौद चौक मार्गे लालमहाल येथे प्रचारफेरीचा समारोप होणार आहे.
शहर
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
महाराष्ट्र
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- इराण-इस्रायल संघर्षात मुंबईच्या खलाशाचा बळी; सोळंकी कुटुंबावर महिन्याभरात दुसरे दुःख
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले
- त्वचेला नैसर्गिक चमक हवी? बीटच्या साध्या उपायांनी मिळवा गुलाबी आणि निरोगी कांती!
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
विडियो गॅलेरी

देश विदेश
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले


























Subscribe to my channel
