पुण्यातील लुल्लानगरमधील हॉटेलला आग; घटनास्थळी अग्निशमन विभागाच्या चार गाड्या दाखल

पुण्यातील लुल्लानगर भागातील झीके(जहीर खान) हॉटेलला आज(मंगळवार) सकाळी आग लागली आहे. या आग विझवण्यासाठी अग्निशमन विभागाकडून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

घटनास्थळी अग्निशमन विभागाच्या चार गाड्या दाखल झाल्या आहेत. सात मजली इमारतीच्या सर्वांत वरच्या मजल्यावर ही आग लागली असल्याने आग नियंत्रणात आणण्यासाठी कसरत करावी लागत आहे. ही संपूर्ण काचेची इमारत असल्याने इमारतीमध्ये मोठ्या प्रमाणावर धूर पसरला आहे. धूर बाहेर पडण्यास पुरेसी जागा नसल्याचे दिसत आहे. हा धूर बाहेर पडावा म्हणून इमारतीच्या काचाही फोडल्या जात आहेत. या इमरतीतमध्ये विविध कार्यालये तसेच सराफा व्यावसायिकांची दुकानेही आहेत.

प्राथमिक माहिती अशी सुद्धा आहे की या हॉटेलमध्ये काम करणारे काही कर्मचारी हे रात्री त्याच हॉटेलमध्ये झोपतात. त्यामुळे ते जर आत असतील तर निश्चितच ही अधिक चिंतेची बाब म्हणावी लागणार आहे.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *