पुणे : हॉटेल व्यवसाय टाकण्यासाठी दरोडा; दोन पिस्तुले, २२ जिवंत काडतुसे, ४३ तोळे सोन्याचे दागिने जप्त

पुण्याच्या तळेगाव दाभाडे येथे भर दिवसा पिस्तूलाचा धाक दाखवून २४ तोळे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम घेऊन पसार झालेल्या सराईत गुन्हेगारांना पिंपरी- चिंचवडच्या गुन्हे शाखा युनिट तीनने बेड्या ठोकल्या आहेत. आरोपीकडून १२ चैन स्नॅचिंगचे गुन्हे उघड झाले असून दोन पिस्तुले, २२ जिवंत काडतुसे, ४३ तोळे सोन्याचे दागिने असा एकूण २५ लाख २७ हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. हा दरोडा हॉटेल व्यवसाय टाकण्यासाठी टाकला असल्याचे उजेडात आले आहे. अमर हरिदास दहातोंडे, अनिल गोरखनाथ मस्के, राजू रविशंकर यादव, सोपान अर्जुन ढवळे, प्रशांत राजू काकडे अशी दरोडा टाकलेल्या गुन्हेगारांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दहा जानेवारीला तळेगाव येथे भर दुपारी पाच अनोळखी व्यक्तींनी पिस्तूलाचा धाक दाखवून दरोडा टाकून २४ तोळे सोन्याचे दागिने, रोख रक्कम आणि मौल्यवान ऐवज घेऊन पसार झाले होते. तळेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हे शाखा युनिट तीन चे पोलिस अधिकारी आरोपींचा शोध घेत होते त्यात त्यांना यश आले. आरोपी अमर हरिदास दहातोंडे, अनिल गोरखनाथ मस्के, राजू रविशंकर यादव, सोपान अर्जुन ढवळे, प्रशांत राजू काकडे, यांना गुन्हे शाखा युनिट तीन बेड् ठोकल्या. गुन्हेगार राजू यादव आणि सोपान ढवळे यांना हॉटेल व्यवसाय टाकायचा होता. पैश्यांची जुळवाजुळव करत असताना त्यांना माहिती मिळाली की तक्रारदार यांच्या घरी काळा पैसा दडवून ठेवला आहे. ते पूर्वी गुटख्याचे व्यापारी होते. अशी माहिती मिळताच दरोडा टाकण्याचा प्लॅन आखला. आरोपींनी तक्रारदार यांच्यावर पाळत ठेवली. घरी जात असताना त्यांचा दुचाकीवरून पाठलाग केला. घरात पोहचताच त्याच्या पाठीमागे जाऊन पिस्तूलाचा धाक दाखवला आणि सोन्याचे दागिने, रोख रक्कम घेऊन पोबारा केला. त्यांना गुन्हे शाखा युनिट तीन बेड्या ठोकल्या आहेत. 

गुन्हेगार राजू रविशंकर यादववर अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा असलेल्या गुन्ह्यात आठ वर्षे जेलमध्ये राहिलेला आहे. मोका च्या गुन्ह्यातून २०२० ला जमिनीवर बाहेर आलेला आहे. अनिल मस्केवर पनवेल पोलिस ठाण्यात हत्येचा गुन्ह्या दाखल आहे. तो सध्या जमिनीवर बाहेर आहे. अनिल मस्के आणि अमर दहातोंडे याच्यावर पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालयात चैन स्नॅचिंग केल्याचे गुन्हे दाखल आहेत. 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply