पुणे : हे विकासाचे राज्य आहे की सुडाचे? राणेंचा सवाल

पुणे : राज्याच्या राजकारणात सुरू असलेल्या वादंगाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, भाजपचे नेते, विधानसभेचे विरोधी पक्षनेते बऱ्याच महिन्यांनी 'सकाळ'च्या व्यासपीठावर रविवारी एकत्र आले आहेत. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांनी या व्यासपीठावर उपस्थिती लावली होती त्यावेळी नारायण राणे बोलत होते.

पवार, फडणवीस यांच्यासह माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदेही या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. सकाळ समूहाचे अध्यक्ष प्रताप पवार हे यावेळी उपस्थित असून त्यावेळी बोलताना भाजपाचे नेते आणि मंत्री नारायण राणे यांनी आपल्या मागच्या प्रवासावर प्रकाश टाकला. महाराष्ट्र म्हटल्यानंतर अंगात वेगळीच उर्जा संचारते अशा राज्याचा मी मुख्यमंत्री झालो याचा मला अभिमान वाटतो. मुख्यमंत्री पद हे अभिमान आणि गर्वाने मिरवायचे नाही तर जबाबदारीचे आहे. असं ते बोलताना म्हणाले.

आज पर्यंत अनेक मुख्यमंत्री झाले आहेत. यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक यांनी महाराष्ट्राला दिशा दिली असल्याचं त्यांनी आपल्या भाषणात सांगितलं आहे. अलीकडील काळात राज्यात उद्योग आहेत पण उद्योगात राज्य कुठे आहे याचा प्रश्न पडतो. वीज नाही, इफ्रास्ट्रक्चर नाही, कायदा सुव्यवस्था नाही मग अशा राज्यात कोण येणार जीव धोक्यात घालून? असा सवाल त्यांनी केला आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले की, मिळालेली सत्ता ही कोणा एका कुटुंबियासाठी नसून महाराष्ट्रातील 12 ते 13 कोटी जनतेसाठी आहे. मी मंत्री झाल्यानंतर राज्यात उद्योग यावेत म्हणून अनेक प्रयत्न केले, पत्र पाठवले पण उत्तर मिळाले नाहीत. मी प्रयत्न केले, मुख्यमंत्री, उद्योग मंत्री यांना पत्र लिहीले पण त्याला त्यांनी उत्तर नाही त्यामुळे हे विकासाचे राज्य आहे की सुडाचे राज्य हेच कळत नाही म्हणत त्यांनी महाविकास आघाडीवर निशाना साधला आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply