पुणे : हडपसर भागात मजुराचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरु

पुणे : हडपसर भागात मजुराचा खून करण्यात आल्याची घटना घडली. या प्रकरणी एका मजुराच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अनैतिक संबंधातून खून झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. अरुण किसन सूर्यवंशी (वय ५४, रा. शेवाळवाडी पीएमपी थांब्याजवळ, मांजरी) असे खून झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी पिताराम केवट (वय २३, रा. शेवाळवाडी, मूळ रा. मध्यप्रदेश) याच्या विराेधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, तो पसार झाला आहे.

आरोपी पिताराम आणि अरुण शेजारी आहेत. दोघे एका नर्सरीत कामाला होते. दाेघे कामावरुन घरी आल्यानंतर रात्री दारु पिण्यासाठी गेले. पिताराम घरी आला. अरुण घरी परत न आल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी अरुण बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. पोलिसांनी तपास सुरू केला. तेव्हा मांजरीतील ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्राच्या परिसरातील मोकळ्या जागेत अरुणचा मृतदेह सापडला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त विक्रम देशमुख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद गोकुळे, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिगंबर शिंदे, विश्वास डगळे यांनी घटनास्थळी भेट दिली. पिताराम हा पत्नीच्या चारित्र्याचा संशय घेत होता. अनैतिक संबंधातून अरुण यांचा खून झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply