पुणे :  स्क्रॅप व्यावसायिकाकडे दीड कोटींच्या खंडणीची मागणी

पुणे : स्क्रॅपचा व्यवसाय करणाऱ्या भागीदाराला जीवे मारण्याची धमकी देऊन दीड कोटी रुपयांची खंडणी मागितल्याची घटना कोंढवा बुद्रूक येथील येवलेवाडी परिसरात घडली. याप्रकरणी संतोष झवेरचंद सेठिया (वय ६०, रा. मुकुंदनगर) यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून कोंढवा पोलिसांनी शिवाजी जलसेराव उबाळे (रा. रामटेकडी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार फेब्रुवारी ते मार्च या कालावधीत घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी संतोष सेठिया आणि शिवाजी उबाळे याचे वडील यांच्यामध्ये भागीदारीत स्क्रॅपचा व्यवसाय आहे. शिवाजी उबाळे याच्या वडिलांनी सध्या फिर्यादीसोबत काम बंद केले होते. परंतु उबाळे याने सेठिया यांच्या वर्कशॉपवर जाऊन कामाचे दीड कोटी रुपये देण्याची मागणी केली. ही रक्कम न दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. या घटनेनंतर त्यांनी हा वाद आपसांत मिटविण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांच्यात कोणताच तोडगा निघाला नाही. त्यामुळे सेठिया यांनी कोंढवा पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. पोलिसांनी त्या अर्जाची चौकशी करुन गुन्हा दाखल केला आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply