पुणे : सोलापूर रस्त्यावर वाहनाच्या धडकेने दुचाकीस्वाराचा मृत्यू

पुणे : भरधाव वाहनाच्या धडकेने दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना पुणे-सोलापूर रस्त्यावर घडली. अपघातानंतर पसार झालेल्या दुचाकीस्वारविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शेखर सुरेश कुंदेकर (वय ३५, रा. लक्ष्मीकमल हाईट्स, फुरसुंगी, सासवड रस्ता) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. शेखर कुंदेकर पहाटे साडेतीनच्या सुमारास पुणे-सोलापूर रस्त्याने निघाले होते. कुंजीरवाडी परिसरात धनश्री लाॅनसमोर भरधाव वाहनाने कुंदेकर यांच्या वाहनाला धडक दिली. अपघातानंतर वाहनचालक पसार झाला असून पोलीस उपनिरीक्षक देशमुख या प्रकरणाचा तपास करत आहेत.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *