पुणे : सोन्यापेक्षा महागड्या व्हेल माशाच्या उलटीची पुण्यात तस्करी; टोळी अटकेत; आंतराष्ट्रीय बाजार पेठेत पाच कोटींची किंमत

पुणे : आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्यापेक्षा जास्त भाव असलेल्या व्हेल माशाच्या उलटीची पुण्यात तस्करी होत असल्याचं समोर आलं आहे. याप्रकरणी एका टोळीतील चार जणांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याजवळ असलेल्या या उलटीची किंमत सुमारे ५ कोटी रुपये इतकी आहे. 

पोलिसांच्या माहितीनुसार, याप्रकरणी अक्षय ठाणगे, विजय ठाणगे, अजीम काजी, नवाज कुडपकर, राकेश कोरडे अशी अटक कलेल्या आरोपींची नावं आहेत. पुण्यातील या टोळीकडून पोलिसांनी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील बाजारभावाप्रमाणं सुमारे ५ कोटी रुपये किंमतीचं जवळजवळ ५ किलो वजनाची उलटी जप्त केली आहे.

आरोपी पुण्यात एका व्यक्तीला हा पदार्थ देण्यासाठी आले होते. डेक्कन पोलिसांना गोपनीय माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून या चौघांना अटक केली आहे. आरोपी हे मूळचे कोकणातील दापोलीचे रहिवासी असून हा पदार्थ विकण्यासाठी ते पुण्यात आले होते. याचा वापर नेमका कशासाठी केला जाणार होता याचा तपास पोलीस करत आहेत.

व्हेल माशाचा वावर खोल समुद्रात असतो. ब्ल्यू व्हेलला देव मासा म्हणून ओळखले जाते. या माशाच्या कोणत्याही अवयवाचा व्यापारी वापर गुन्हा आहे. हा मासा शारीरिक प्रक्रियेतून उलटी करतो. ती उलटी द्रव स्वरूपात असते. मात्र, उलटी पाण्यात विरघळणारी नसते. या उलटीला अंबर ग्रीस असे म्हटले जाते. त्याच्या न विरघळणाऱ्या द्रव स्वरूपामुळे या उलटीचा गठ्ठा तयार होतो. तो पाण्यावर तरंगू लागतो. हा गठ्ठा जाळ्यात अडकतो किंवा किनाऱ्यापर्यंत तरंगत येतो. अत्तर निर्मितीत एक खूप महत्त्वाचा घटक म्हणून व्हेल माशाच्या या उलटीचा वापर केला जातो असे सांगितले जाते.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply