
समाजमाध्यमावर चित्रफीत तसेच छायाचित्रे प्रसारित करण्याची धमकी देऊन मोहोळचे आमदार यशवंत माने यांच्याकडून खंडणी उकळण्याचा (सेक्सटाॅर्शन) प्रकार उघडकीस आला आहे. पुणे पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेच्या पथकाने तपास करुन एका आरोपीला राजस्थानमधील एका गावातून अटक केली.. आरोपीने ९० जणांना धमकावून खंडणी उकळण्याचा प्रयत्न केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.
रिझवान अस्लम खान ( वय २४, रा. सिहावली महारायपूर, जि . भरतपूर, राजस्थान ) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. न्यायालयाने त्याला पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. राजस्थानताील सिहावली महारायपूर गावात सेक्सटॉर्शनच्या माध्यमातून पैसे उकळण्याचा उद्योग अनेकजण करतात. मात्र, त्यांना दूरध्वनी क्रमांक कसे उपलब्ध झाले, या दृष्टीने तपास करण्यात येत आहे. सायबर गुन्हे शाखेच्या कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेस आमदार माने, अतिरिक्त पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, सायबर गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मीनल सुपे पाटील आदी उपस्थित होते.
आमदार माने मोहोळ मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे विधानसभेवर निवडून गेले आहेत. ते पुण्यात वास्तव्याला आहेत. यांच्या गेल्या गुरुवारी ( २ फेब्रुवारी) त्यांच्या समाजमाध्यमातील खात्यावर अनोळखी व्यक्तीने संपर्क साधला. त्यानंतर एकापाठोपाठ त्या मोबाइलवरून त्यांना व्हिडिओ कॉल्स आले. संबंधित व्यक्ती महिलेच्या आवाजात माने यांच्याशी बोलत होती. त्यांना खंडणीसाठी धमकावत होती. अश्लील ध्वनिचित्रफीत प्रसारित करण्याची धमकी देऊन आमदार माने यांच्याकडे एक लाख रुपये खंडणी मागितली. अशा पद्धतीने आरोपीने अनेकांना धमकावले असल्याचे लक्षात आल्यावर आमदार माने यांनी त्वरित पोलिसांशी संपर्क साधला. त्यानंतर सायबर गुन्हे शाखेच्या तातडीने तपास सुरू केला. दूरध्वनी राजस्थानमधील भरतपूर परिसरातुन येत असल्याचे तांत्रिक विश्लेषणात निदर्शनास आले. त्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक बलभीम ननावरे आणि पथक तेथे रवाना झाले.
गेल्या महिन्यात राजस्थानातील भरतपूर परिसरातील एका गावात पुणे पोलिसांनी कारवाई करुन सेक्सटॉर्शनचा प्रकार उघडकीस आणला होता. पुणे पोलिसांचे पथक आठवडाभर राजस्थानात तळ ठोकून होते. स्थानिक पोलिसांच्या मदतीने या पथकाने गुरुवारी आरोपी रिझवान याला अटक केली. आरोपी रिझवानने देशभरातील अनेकांना खंडणीसाठी धमकावले आहे. त्याला सीमकार्ड तसेच बँक खाते उपलब्ध करुन देण्याऱ्यांचा शोध घेण्यात येत आहे.
गेल्या वर्षभरात सेक्सटॉर्शनचे प्रकार वाढीस लागले असून अशा प्रकारचे पाच गुन्हे पुण्यात दाखल झाले आहेत. खंडणीसाठी धमकावल्यामुळे पुण्यातील दोन युवकांनी आत्महत्या केल्या होत्या. धनकवडीतील युवक शंतनु वाडकर याने २८ सप्टेंबर २०२२ ला इमारतीच्या दहाव्या मजल्यावरून इमारतीच्या उडी मारून आत्महत्या केली. त्यानंतर आणखी एका युवकाने आत्महत्या केली होती. बदनामीच्या भीतीपोटी अनेक जण पोलिसांकडे तक्रार देणे टाळतात, असे निरीक्षण पोलिसांनी नोंदविले आहे.
शहर
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
महाराष्ट्र
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- इराण-इस्रायल संघर्षात मुंबईच्या खलाशाचा बळी; सोळंकी कुटुंबावर महिन्याभरात दुसरे दुःख
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- Pune Crime : वहिनीवर घरातच अत्याचार; 43 वर्षीय चुलत दिराला 10 वर्षांची सक्तमजुरी, बारामती न्यायालयाचा निकाल
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले
- त्वचेला नैसर्गिक चमक हवी? बीटच्या साध्या उपायांनी मिळवा गुलाबी आणि निरोगी कांती!
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
देश विदेश
- Health - साधी डाळ बनवा चविष्ट: ५ झणझणीत तडके देण्याची सोपी कृती जाणून घ्या
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती



























Subscribe to my channel


