पुणे – ससून रुग्णालयात १६ वर्षांनंतर क्षयरोग विभागाला मिळाला वॉर्ड

पुणे - ससून रुग्णालयात तब्बल १६ वर्षांनंतर क्षयरोगाच्या रुग्णांवर उपचारासाठी हक्काचा वॉर्ड मिळाला. रुग्णालयाच्या आवारातील नवीन अकरा मजली इमारतीमध्ये नवव्या मजल्यावर हा वॉर्ड जुन्या इमारतीमधून स्थलांतरित करण्यात आला.

ससून रुग्णालयातील १८०० पैकी फक्त ७२ खाटा मिळविण्यासाठी एक-दोन नाही तर १६ वर्षांपासून पाठपुरावा सुरू आहे. पण, ससून रुग्णालयाला क्षयरोगाची ‘अॅलर्जी’ असल्याप्रमाणे प्रशासनाचा कारभार सुरू असल्याचे निदान झाल्याचे वृत्त ‘सकाळ’ने प्रसिद्ध केले. त्यानंतर ससून रुग्णालयाच्या प्रशासकीय पातळीवर वेगाने हालचाली झाल्या आणि क्षयरोग विभागाला नवीन इमारतीमध्ये वॉर्ड देण्याचा निर्णय झाला. याचा ‘सकाळ’ने सातत्याने पाठपुरावा केला होता.

बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. विनायक काळे म्हणाले, ‘क्षयरोग विभागाच्या जागेवर ससून रुग्णालयाची नवीन इमारती उभारली होती. त्यामुळे या विभागाचे स्थलांतर पर्यायी जागेत केले होते. या विभागासाठी एकाच ठिकाणी ७० खाटांचा स्वतंत्र वॉर्ड मिळावा, ही मागणी होती. त्यामुळे नवीन इमारतीमध्ये त्यांना वॉर्ड देण्यात आला. त्यामुळे आता या विभागाकडून रुग्णसेवाचा दर्जा उंचावेल.'

 


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply