पुणे : सदस्यपदासाठी ३०३३,तर सरपंचपदासाठी ५६० उमेदवार; जिल्ह्यातील २२१ ग्रामपंचायतींची निवडणूक

पुणे : जिल्ह्यातील २२१ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. त्यानुसार निवडणूक प्रक्रिया सुरू असून १८ डिसेंबरला मतदान होणार आहे, तर २० डिसेंबरला निकाल जाहीर होणार आहे. तसेच निकालाची अधिसूचना २३ डिसेंबर रोजी जाहीर केली जाणार आहे. जिल्ह्यातील १२ तालुक्यांमधील २२१ ग्रामपंचायतींच्या ७३१ सदस्य पदांसाठी आणि सरपंचपदासाठी ही निवडणूक होत आहे.

निवडणूक कार्यक्रमानुसार ७३१ सदस्यपदासाठी ५०३५ उमेदवारांनी ५०७८ उमेदवारी अर्ज दाखल केले होते. प्राप्त अर्जांची छाननी केल्यानंतर ३३ उमेदवारांचे ४८ अर्ज बाद झाले. त्यामुळे ५००४ वैध उमेदवारांचे ५०३० उमेदवारी अर्ज वैध ठरले आहेत. १९७१ उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने ३०३३ उमेदवार रिंगणात आहेत. सरपंचपदासाठी १०३५ उमेदवारांनी १०४० उमेदवारी अर्ज दाखल केले होते. छाननीअंती १२ उमेदवारांचे अर्ज बाद झाले. ४६३ उमेदवारांनी अर्ज मागे घेतला आहे,त्यामुळे आता सरपंचपदासाठी ५६० उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.

जिल्ह्यातील वेल्हे तालुक्यातील २८ ग्रामपंचायती, भोरमधील ५४, दौंड आठ, बारामती १३, इंदापूर २६, जुन्नर १७, आंबेगाव २१, खेड २३, शिरूर चार, मावळ नऊ, मुळशी ११ आणि हवेली तालुक्यातील सात अशा १२ तालुक्यांतील एकूण २२१ ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे, असे जिल्हा निवडणूक शाखेकडून सांगण्यात आले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply