पुणे शहरात व्हेंटिलेटरवर कोरोनाचा एकही रुग्ण नाही

पुणे - शहरात गेल्या सहा दिवसांपासून कोरोनाचा एकही रुग्ण व्हेंटिलेटरवर नाही. त्यामुळे कोरोनाच्या उद्रेकाची तीव्रता आता कमी होत असल्याचे चित्र शहरात दिसत आहे. शहरात सोमवारी (ता. ७) कोरोनाचे पाच रुग्ण व्हेंटिलेटरवर होते. त्याच वेळी या पाचही कोरोनाच्या रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आले. त्यानंतर सलग सहा दिवस कोरोनाच्या एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद नाही. तसेच, व्हेंटिलेटवर नव्याने कोणत्याही रुग्णाला ठेवावे लागले नाही. तसेच, ऑक्सिजनवर ठेवाव्या लागणाऱ्या रुग्णांची संख्याही अत्यल्प आहे. या सर्व निरीक्षणावरून पुण्यात कोरोनाच्या साथीच्या उद्रेकाची तीव्रता कमी होत असल्याचे दिसते. शहरात कोरोनाचा संसर्ग होणाऱ्या रुग्णांची संख्या सातत्याने कमी आहे. ही संख्या आता दोन आकड्यापर्यंत कमी झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून रुग्णसंख्या पन्नासपेक्षाही कमी झाली आहे. पुण्यात सद्यःस्थितीत ६०८ रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे देण्यात आली. त्यापैकी एकही रुग्ण व्हेंटिलेटर नाही. गेल्या चोवीस तासांमध्ये १३९ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. रुग्णालयातील कोरोनाबाधीतांची संख्या ३.६१ टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आरोग्य खात्याला यश आले आहे. कोरोनाच्या रुग्णांची संख्या कमी होणे म्हणजे शहर कोरोनामुक्त दिशेने प्रवास सुरू आहे. शाळा, जलतरण तलाव, चित्रपट गृहे, व्यायामशाळा यावरील निर्बंधही आता उठवले आहेत. त्यामुळे दोन वर्षांपूर्वीप्रमाणे दैनंदिन व्यवहार सुरू असल्याचे दिसते, असे निरीक्षण सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांनी नोंदविले आहे. पुण्यात कोरोनाचा एकही रुग्ण उपचारांसाठी व्हेंटिलेटवर नाही, याचा अर्थ कोरोनाचा प्रवास त्याच्या शेवटाच्या दिशेने सुरू झाला आहे. हे एक चांगले लक्षण दिसत आहे. सध्या जे रुग्ण आढळत आहेत, त्यापैकी बहुतांश रुग्णांना चाचणी केल्याने ते पॉझिटिव्ह येत आहेत. त्यातील बऱ्याच रुग्णांना कोरोनाची कोणतीच लक्षणे नाहीत किंवा सौम्य लक्षणे आहेत. शहरातील कोरोना उद्रेक
  • तपासलेले नमुने - ४ कोटी ५१ लाख आठ हजार ३८२
  • कोरोनाचे निदान झालेले रुग्ण - सहा लाख ६१ हजार ५४१
  • कोरोनामुक्त झालेले रुग्ण - सहा लाख ५१ हजार ५८५
  • मृत्यू झालेले रुग्ण - ६०८


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply