पुणे रेल्वे स्थानकात बाँब ठेवल्याची अफवा

पुणे - पुणे रेल्वे स्थानकात बाँब ठेवल्याचा एक निनावी फोन मंगळवारी सायंकाळी पोलिसांनाआल्यानंतर पोलिसांनी संपूर्ण रेल्वे स्थानक परिसराची तपासणी केली. तपासणीमध्ये पोलिसांना बाँबसदृश संशयास्पद वस्तू सापडली नाही. अखेर पोलिसांनी सुटकेचा नि:श्वास टाकत बाँब ठेवल्याची धमकी देणाऱ्याचा शोध सुरु केला. मंगळवारी सायंकाळी पुणे पोलिसांच्या नियंत्रण कक्षात एका अनोळखी व्यक्तीने रेल्वे स्थानकात बाँब ठेवला असल्याचा फोन केला. ‘बाँब ठेवल्याची जागा दाखवितो. त्यासाठी सात कोटी रुपये द्यावे लागतील,’ असे फोन करणाऱ्या व्यक्तीने पोलिसांना सांगितले. त्यानंतर पुणे पोलिसांचे बाँब शोधक पथकाने (बिडीडीएस) रेल्वे स्थानकात जाऊन रेल्वे स्थानक परिसराची कसून तपासणी केली. त्यावेळी तेथे कोणत्याही प्रकारची बाँबसदृश वस्तू पोलिसांना आढळून आली नाही. अखेर पोलिसांनी फोन करून अफवा पसरविणाऱ्याचा शोध घेण्यात येणार असल्याचे तसेच प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचेही पोलिसांनी सांगितले.


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply