पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसेचे नेते अमोर मिटकरींच्या भाषणाविरोधात पुण्यात ब्राह्मण महासंघाचं आंदोलन

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसेचे नेते अमोर मिटकरी यांनी केलेल्या एका भाषणाविरोधात ब्राह्मण महासंघानं पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुख्य कार्यालयाबाहेर आंदोलन केलं. यावेळी महासंघाचे प्रमुख अनिल दवे यांनी आपल्या सहकार्यांसह मिटकरींविरोधात घोषणाबाजी केली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्तेही आक्रमक झाले होते.

आनंद दवे म्हणाले, अमोल मिटकरी हे मूर्ख आहेत. ते ब्राह्मण समाजाविरोधात बोलले आहेत असं आम्ही म्हणतच नाही. त्यांनी कोणत्याही समाजाचं नाव घेतलेलं नव्हतं पण त्यांनी हिंदु धर्मातील एक मंत्र चुकीच्या पद्धतीनं वापरला यावर आमचा आक्षेप आहे. मी माझी बायको पुरोहिताला देत आहे असं त्यांनी वक्तव्य वापरलं आहे हे चुकीचं आहे. हेच विधान ते नमाजविरोधात बोलू शकतील का? हिंदु धर्माचं त्यांनी विडंबन केल्यामुळं आम्ही त्याचा निषेध करत आहोत. असा मंत्र लग्नांमध्ये बोललाच जात नाही, असा आक्षेपही त्यांनी घेतला नाही.

 


विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *