पुणे : शहराच्या परिसरात नवा विमानतळ कोठेही झाला तरी, लोहगाव विमानतळाचे स्थलांतर होणार नसल्याची घोषणा खासदार आणि विमानतळ सल्लागार समितीचे अध्यक्ष गिरीश बापट यांनी गुरुवारी येथे केली. पुण्याच्या परिसरात होत असलेल्या नव्या विमानतळाला विरोध नाही; मात्र लोहगाव विमानतळ हा नागरिकांसाठी सोयीचा असल्यामुळे येथील सुविधा वाढविण्यावर केंद्र सरकारची भूमिका आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. विमानतळ विस्तारीकरणाचे काम ६५ टक्के पूर्ण झाले असून डिसेंबर अखेरीस ते पूर्ण होईल, याचाही त्यांनी पुनरुच्चार केला.
लोहगाव विमानतळ विस्तारीकरणाच्या कामाचा आढावा घेतल्यावर बापट पत्रकार परिषदेत बोलत होते. विमानतळाचे संचालक संतोष ढोके तसेच हवाईदलाचे अधिकारी याप्रसंगी उपस्थित होते. बापट म्हणाले, ‘‘आंतरराष्ट्रीय विमानतळ पुरंदरमध्ये होणार का बारामतीजवळ हे अद्याप निश्चित नाही. त्याबाबत राज्य सरकारकडून वेळकाढूपणा सुरू आहे. तसेच त्याचे काम सुरू झाल्यावर तो पूर्ण होण्यासाठी पाच वर्षांचा कालावधी लागेल. दरम्यानच्या काळात पुणेकरांची गरज पाहता, लोहगाव विमानतळाचे विस्तारीकरणाचे काम सुरू केले आहे. त्याला आणखी वेग देण्यात येईल.
विमानतळासाठी केंद्र सरकारने १३ एकर जागा दिली असून त्या बदल्यात हवाई दलाला चंडीगडमध्ये जागा देण्यात येईल. कार्गोसाठीही जागा मिळाली असून प्रशासकीय प्रक्रिया आणखी वेगाने पूर्ण करण्यात येईल.’’ लोहगाव विमानतळाच्या धावपट्टीची लांबी वाढविण्यासाठी केंद्रीय विमान वाहतूक मंत्र्यांना यापूर्वीच पत्र दिले आहे. त्यानुसार विमानतळाच्या पश्चिमेकडे २५० मीटरपर्यंत धावपट्टी वाढविता येऊ शकेल. तसेच, आंतरराष्ट्रीय विमाने पुण्यात येण्यासाठी आणखी जागा लागेल. त्यासाठी शेतकऱ्यांची, एलआयसी, खासगी आणि हवाई दलाची जागा आणखी मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे बापट यांनी सांगितले. डिसेंबरपर्यंत विस्तारीकरणाचे काम पूर्ण झाल्यावर पुण्यातूनच थेट प्रवाशांना परदेशात जाता येईल, यावर लक्ष केंद्रित करून पाठपुरावा करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
नवे विमानतळ होईपर्यंत पुण्याच्या विमानतळावरील वाहतूक सुविधा येत्या सहा महिन्यांत दुप्पट क्षमतेची होणार आहे. त्यामुळे आणखी किमान पाच वर्षांचा प्रश्न सुटेल. पूरक सुविधा वाढविण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा सुरू आहे.
- गिरीश बापट, खासदार
विमानतळ विस्तारीकरणाचे काम वेगाने सुरू असून पार्किंगची इमारत जुलैअखेर पूर्ण होईल आणि विस्तारीकरणाचे काम डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल
- संतोष ढोके,संचालक, लोहगाव विमानतळ
नव्या इमारतीची वैशिष्ट्ये
- ५ लाख २० हजार चौरस फूटबांधकाम
- २३०० दर तासाला प्रवाशांची वाहतूक
- ५०० विमानांची रोजची वाहतूक शक्य
- ४७५ कोटी रुपये प्रकल्पाची किंमत
- २ कोटी दरवर्षी प्रवाशांची ये- जा शक्य
- ३४ चेक इन काउंटर
- ५ एरो नवे ब्रिज
- ७ लाउंज
- २ मजली इमारत
हे पण वाचा-
शहर
- टीएमसीमध्ये मोठा भूकंप! २२ खासदार बंडाच्या तयारीत, ममता बॅनर्जींच्या पक्षावर अस्तित्वाचे संकट.
- मुंबई लोकल प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना: तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक, १०९ लोकल फेऱ्या रद्द.
- भारत-अफगाणिस्तान कसोटीत रशीद खान का खेळत नाहीये? जाणून घ्या नेमकं कारण.
- मोठा दिलासा की केवळ आकड्यांचा खेळ? ५५ लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर, पण पूर्ण २ लाखांचा लाभ फक्त ५ लाख शेतकऱ्यांनाच?
महाराष्ट्र
- टीएमसीमध्ये मोठा भूकंप! २२ खासदार बंडाच्या तयारीत, ममता बॅनर्जींच्या पक्षावर अस्तित्वाचे संकट.
- मुंबई लोकल प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना: तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक, १०९ लोकल फेऱ्या रद्द.
- भारत-अफगाणिस्तान कसोटीत रशीद खान का खेळत नाहीये? जाणून घ्या नेमकं कारण.
- मोठा दिलासा की केवळ आकड्यांचा खेळ? ५५ लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर, पण पूर्ण २ लाखांचा लाभ फक्त ५ लाख शेतकऱ्यांनाच?
गुन्हा
- पुणे: नसरापूर नराधम आरोपी भीमराव कांबळे विरोधात खटल्याला वेग; विशेष न्यायालयात साक्षीदारांचे जबाब नोंदवणे सुरू!
- दिल्ली विद्यापीठाच्या सहाय्यक प्राध्यापिकेची घरातच हत्या; ओळखीच्या व्यक्तीचाच हात असल्याची शक्यता!
- पुणे: जिल्ह्यात मोबाईल ॲपद्वारे गर्भलिंग निदान; पोर्टेबल सोनोग्राफी मशिनचा 'असा' होतोय वापर!
- नागपूर दर्गा धर्मांतर प्रकरण: तरुणीला बुरखा आणि कलमा वाचायला लावून बळजबरीने धर्मांतराचा प्रयत्न
राजकीय
- भाजपला रामराम! के. अण्णामलाई यांची नवी राजकीय 'चळवळ'; आगामी निवडणुकीसाठी कंबर कसली!
- तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी खळबळ! २३ खासदार बंडखोर गटाच्या संपर्कात, ममता बॅनर्जींच्या अडचणीत वाढ?
- कर्नाटकात राजकीय भूकंप: मंत्री रामलिंगा रेड्डींचा राजीनामा; खातेवाटपावरून मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप!
- छगन भुजबळ दिल्लीला जाणार? राज्यसभेसाठी नाव निश्चित होण्याची शक्यता, समीर भुजबळांच्या मंत्रिमंडळ प्रवेशाची चर्चा!
इतर
- सकाळी उठल्यावर ही ५ लक्षणं दिसली तर सावध व्हा! किडनी खराब होण्याचे असू शकतात संकेत
- मुंबई हादरली: डोकेडिया कुटुंब मृत्यू प्रकरणाचे गूढ वाढले; टरबूज नाही, तर 'उंदीर मारण्याचे विष' कारणीभूत?
- आजचे राशीभविष्य ५ जून २०२६: ग्रहांच्या आशीर्वादाने नशीब उजळणार, जाणून घ्या काय सांगतात तुमचे तारे!
- पुणे: सामाजिक बांधिलकी जपत 'ONP Hospitals'तर्फे ७ जून रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन!
मनोरंजन
- आयपीएल फायनल नंतर गुजरात टायटन्सला मोठा धक्का! टीम बसमध्ये शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग; शुभमन गिलसह सर्व खेळाडू सुखरूप!
- अभिनेत्री यमुना हिच्या आयुष्यातील चढ-उतार आणि संघर्षाची कहाणी.
- "आरारारा खतरनाक…": 'मुळशी पॅटर्न २'ची घोषणा! हक्काच्या घराच्या संघर्षावर आधारित असेल नवा चित्रपट.
- "बॉलिवूडमध्ये मराठी कलाकारांना 'घाटी' समजलं जातं"; वैभव मांगलेंचे बॉलीवूडवर अत्यंत खळबळजनक भाष्य!
विडियो गॅलेरी

पुणे आणि पिंपरी-चिंचवडला हादरवून सोडणाऱ्या विषारी दारूकांडाचा थरारक खुलासा
नसरापूर हादरलंय… आणि प्रत्येक आई-बापाच्या काळजात भीतीचं सावट दाटलंय! @punebatamya
संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याला वैचारिक दिशा देणारे महामानव…
देश विदेश
- खिसा रिकामा, महागाई जोरात! २००० ते २०२६ दरम्यान जीवनावश्यक वस्तू ५ ते ६ पटीने महागल्या; पेट्रोल अन् दुधाचे दर ऐकून चक्रावाल!खिसा रिकामा, महागाई जोरात! २००० ते २०२६ दरम्यान जीवनावश्यक वस्तू ५ ते ६ पटीने महागल्या; पेट्रोल अन् दुधाचे दर ऐकून चक्रावाल!
- गरिबीवर मात! ई-रिक्षा चालकाच्या मुलाने क्रॅक केली JEE Advanced परीक्षा; आयआयटीत (IIT) जाणारा ठरला गावातील पहिलाच तरुण!
- नोएडा शहरासाठी आजची सकाळ अत्यंत भीतीदायक ठरली, कारण शहरातील दोन वेगवेगळ्या ठिकाणी आगीच्या भीषण घटना घडल्या आहेत.
- पश्चिम बंगाल: तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी फूट! 'ममता बॅनर्जी आता आमच्या नेत्या नाहीत', बंडखोर आमदारांचा खळबळजनक दावा
























Subscribe to my channel




