पुणे : मेट्रो कारशेडसंदर्भात श्वेतपत्रिका विधिमंडळात मांडावी; सामाजिक कार्यकर्ते डॉ. विश्वंभर चौधरी यांची मागणी

पुणे : मुंबई मेट्रोची वादग्रस्त कारशेड कांजुरमार्ग येथून पुन्हा ‘आरे’च्या जंगलात करण्यासंदर्भात राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयाविरोधात पर्यावरणवादी कार्यकर्ते लढत आहेत. यासंदर्भात श्वेतपत्रिका काढून ती विधिमंडळात मांडावी आणि जनतेला वस्तुस्थिती सांगावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते डॉ. विश्वंभर चौधरी यांनी शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली. आतापर्यंत नेत्यांच्या व्यक्तिगत हितसंबंधांपायी सामान्य जनतेच्या पैशांचा खेळखंडोबा झाला असल्याचा आरोप चौधरी यांनी केला.

 मेट्रोची वादग्रस्त कारशेड पुन्हा आरेच्या जंगलात करण्याविषयी राज्य शासनाने निर्णय घेतला असून त्याविरोधात पर्यावरणवादी कार्यकर्ते लढत आहेत, याकडे लक्ष वेधून चौधरी यांनी यासंदर्भात महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले आहेत. २०१४ मध्ये स्थापन झालेल्या भाजप शिवसेना युतीने आधी आरेच्या क्षेत्रात ही कारशेड प्रस्तावित केली होती. नंतर २०१९ मध्ये आलेल्या महाविकास आघाडी सरकारने हा निर्णय रद्द करून कांजुरमार्ग येथील जागा निवडली. आता २०२२ मध्ये आलेल्या आपल्या सरकारने कारशेड पुन्हा आरेमध्ये आणण्याचा निर्णय घेतला आहे. नेत्यांच्या व्यक्तिगत हितसंबंधांपायी सामान्य जनतेच्या पैशांचा होत असलेला अपव्यय दु:खद आहे, याकडे चौधरी यांनी लक्ष वेधले आहे.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply