पुणे :  मेंदूमृत तरुणाच्या अवयवदानामुळे रुग्णाला जीवदान

पुणे : अपघातामुळे मेंदूमध्ये झालेल्या आंतर्गत रक्तस्त्रावामुळे मेंदूमृत झालेल्या २५ वर्षीय युवकाच्या अवयवदानामुळे ५९ वर्षीय गरजू रुग्णाला नवजीवन मिळाले. मेंदूमृत रुग्णाच्या यकृताचे प्रत्यारोपण गरजू रुग्णावर करण्यात आले. त्यामुळे लवकरच तो निरोगी आयुष्य जगू शकणार आहे. अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर येथे या युवकाचा अपघात झाला. रुग्णालयातील उपचारांदरम्यान त्याला मेंदूमृत जाहीर करण्यात आले.

कुटुंबीयांनी त्याचे अवयव दान करण्याचा निर्णय घेतल्यानंतर ग्रीन कॉरिडॉरमार्फत त्याचे यकृत शहरात आणण्यात आले. सह्याद्री रुग्णालयात यकृताच्या स्वयंरोगप्रतिकार विकाराने (ऑटोइम्यून) ग्रासलेल्या रुग्णावर सह्याद्री रुग्णालयाच्या अवयव प्रत्यारोपण आणि हेपॅटोबिलियरी शस्त्रक्रिया विभागाचे संचालक आणि प्रमुख डॉ. बिपीन विभुते यांच्या संघाने ही शस्त्रक्रिया यशस्वी केली. या संघामध्ये डॉ. अनिरुद्ध भोसले, डॉ. अपूर्व देशपांडे, डॉ. शीतल महाजनी, डॉ. मनीष फाटक, डॉ. किरण ताठे, डॉ. मनोज राऊत आणि डॉ. अभिजित माने यांचा समावेश होता.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply