पुणे : मिळकतरातून एका महिन्यात पावणे तीनशे कोटीचे उत्पन्न

पुणे : मिळकतकरात अव्वाच्या सव्वा वाढ केल्याने नागरिकांकडून प्रचंड संताप व्यक्त केला जात असताना दुसरीकडे पुणेकरांनी मिळकतकरापोटी एका महिन्यात तब्बल २७९ कोटी रुपये महापालिकेच्या तिजोरीत जमा केले आहेत. गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात १९१ कोटी रुपये जमा झाले होते. पुणे महापालिकेतर्फे १ एप्रिल ते ३१ मे या कालावधीत मिळकतकर भरणाऱ्या नागरिकांना ५ ते १० टक्के सवलत दिली जाते. त्यामुळे पुणेकरांकडून मिळकतकर भरण्यासाठी प्रचंड प्रतिसाद दिला जातो.

या सवलतीचा एक महिना आज (ता. ३०) संपला, त्यावेळी २७९ कोटी रुपये जमा झाले आहेत. यंदा महापालिकेने ९ लाख ४१ हजार मिळकतकराची बिले नागरिकांना पोस्टाने पाठवली आहेत, तसेच मेसेजही केले आहेत, त्यापैकी २ लाख ३४ हजार ६०३ जणांनी आत्तापर्यंत कर भरला आहे, अशी मिळकतकर विभागाचे प्रमुख विलास कानडे यांनी दिली. यंदा मिळकतकर जमा करताना सर्वाधिक ७३ टक्के नागरिकांनी ऑनलाइन माध्यमातून १९६ कोटी रुपयांहून अधिक रक्कम जमा केली आहे. १७ टक्के नागरिकांनी २९.१६ कोटी रुपये रोख, ९ टक्के नागरिकांनी धनादेशांद्वारे ४९.९१ कोटी रुपये जमा केले आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply