पुणे - प्रेयसीच्या संबंधाबाबत विचारणा करण्यासाठी गेलेल्या दोघांना मारहाण होत असल्याचे पाहुन त्यांना सोडविण्यासाठी गेलेल्या मित्रावर प्रेयसीच्या मामाने तलवारीने वार करुन खुन केला. हि धक्कादायक घटना शुक्रवारी रात्री पावणे अकरा वाजता लोकामन्य नगर येथील पोस्ट ऑफिससमोर घडली. याप्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी एकास अटक केली असून 5 ते 6 जणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. प्रसाद उर्फ गणेश रविंद्र गायकवाड (वय 21, रा. गणेशमळा) असे खुन झालेल्या व्यक्तिचे नाव आहे. तुकाराम मारुती दारवटकर (वय 41, रा. खैरेवाडी, गणेशखिंड रस्ता) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. तर माउली मारुती दारवटकर (वय 41, रा. खैरेवाडी, गणेशखिंड रस्ता), पौर्णिमा रविंद्र भरगुडे (वय 22, रा. लोकमान्य नगर) यांच्यासह 5 ते 6 जणाविरुद्ध विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी राहुल शांताराम वाळज (वय 22, रा.भुकुम) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री साडे दहा वाजता फिर्यादी व त्यांचा मित्र राज असे दोघेजण लोकामन्य नगर येथे फिर्यादीची प्रेयसी काम करीत असलेल्या दुकानामध्ये गेले होते. ते दोघे तेथील व्यवस्थापकाशी प्रेयसीसमवेत काही संबंध आहेत का ? याची विचारणा करीत होते. त्यावेळी प्रेयसीने तिचे मामा तुकाराम व माउली दारवटकर यांना तेथे बोलावले. त्यावेळी त्यांच्यासह 5 ते 6 जण तेथे आले. त्यांनी फिर्यादी व त्यांचा मित्र राज पवार या दोघांना शिविगाळ व मारहाण करण्यास सुरुवात केली. तेव्हा, फिर्यादी यांचा मावसभाऊ रोहित मुळे व त्याचा मित्र गणेश गायकवाड तेथून जात असताना त्यांनी हा प्रकार पाहिला. त्यामुळे ते दोघे भांडणे सोडविण्यासाठी तेथे आले. त्यावेळी तुकाराम दारवटकर याने त्याच्याकडील छोट्या तलवारीने फिर्यादीवर वार केला, तो वार फिर्यादीने चूकविला. त्यानंतर राज पवार व गणेश गायकवायड या दोघांनी तुकाराम दारवटकर यास पकडून ठेवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी तुकाराम दारवटकर याने त्याच्याकडील तलवार गणेशच्या छातीत घुसविल्याने गणेश गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यु झाला.
शहर
महाराष्ट्र
- Eknath Shinde : पुन्हा महायुतीचं सरकार आल्यास मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देणार? एकनाथ शिंदे म्हणाले…
- Maharashtra :“अनिल देशमुखांनी स्वत:च स्वत:वर हल्ला करुन घेतला”; भाजपा आमदाराचा गंभीर आरोप; म्हणाले…
- ‘Manoj Jarange Patil on Kalicharan Maharaj : हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे पाटील यांचे जोरदार प्रत्युत्तर; म्हणाले, “टिकली लावलेला…”
- Satara : पाडा पाडा म्हणणाऱ्या पवारांचे उमेदवारच लोक पाडतील; उदयनराजे यांचे टीकास्त्र
गुन्हा
- Pune : जमिनीच्या वादातून चुलत भावाला मोटारीखाली चिरडण्याचा प्रयत्न, शिरुरमधील केंदूर गावातील घटना
- Pune : गुंतवणुकीच्या आमिषाने ज्येष्ठ नागरिकाची दोन कोटींची फसवणूक, वरद प्राॅपर्टीजच्या संचालकांविरुद्ध गुन्हा
- Pune Crime : पुण्यातील चितळे बंधूंच्या दुकानावर दरोडा; चोरीची घटना CCTV कॅमेऱ्यात कैद
- Pune Crime : दांडेकर पूल परिसरात प्रेमप्रकरणातून तरुणाचा खून, शहरात दोन दिवसात तीन खून
राजकीय
- Maharashtra Politics : विधानसभेपूर्वी मुंबईत काँग्रेसला मोठा धक्का, रवी राजा यांनी भाजपमध्ये केला प्रवेश
- Maharashtra Politics : किशोर जोरगेवार यांचा अखेर भाजपामध्ये प्रवेश, विरोध करणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांनीच केलं स्वागत
- Maharashtra Politics : मुंबई, नांदेडनंतर पुण्यात ठाकरे गटात नाराजी; इच्छुक बंडखोरीच्या तयारीत
- NCP Candidate List : अजित पवारांच्या राष्ट्रवादीची तिसरी यादी जाहीर, नवाब मलिक यांच्या नावाची घोषणा नाहीच
इतर
- Aastad Kale : 'राजन नावाचे क्रिमिनल आहेतच की', मुलाचं नाव जहांगीर ठेवल्यामुळे चिन्मय मांडलेकरच्या ट्रोलिंगवर आस्ताद काळेचं स्पष्ट मत
- Ashok Saraf : नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार अभिनेते अशोक सराफ व रोहिणी हटंगडी यांना जाहीर
- Neena Gupta Interview : 'पैशांसाठी मी तशा भूमिका केल्या, देवाकडे प्रार्थना करायची की...' अभिनेत्रीने स्ट्रगलच्या दिवसांतील मांडली व्यथा
- Munawar Faruqui : 'बिग बॉस १७' विनर मुनव्वर फारुकीची प्रकृती बिघडली, रुग्णालयात उपचार सुरू; नेमकं काय झालं?
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- Shashi Tharoor On Delhi : “दिल्ली देशाची राजधानी राहावी का?” शशी थरूर यांचं थेट मुद्द्यावर बोट, म्हणाले, “या शहरात…”
- Desh Videsh : मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याबद्दल नायजेरियातील मराठी भाषिकांनी मानले पंतप्रधान मोदींचे आभार
- New Delhi : दत्तक मूल तीन महिन्यांपेक्षा मोठे असल्याने मातृत्व रजा नाकारली ; सर्वोच्च न्यायालयाने केंद्राकडे मागितले उत्तर
- Lucknow : ‘बुलडोझर दहशत’, ‘जंगल राज’ संपेल! निकालाचे विरोधी पक्षांकडून स्वागत; सरकारची सावध प्रतिक्रिया