पुणे मार्केट यार्डातील कुरिअर कंपनी दरोडा प्रकरणात आणखी तीन दरोडेखोर गजाआड

पुणे : मार्केट यार्ड भागात एका कुरिअर कंपनीच्या कार्यालयात गोळीबार करुन रोकड लुटणाऱ्या आणखी तीन दरोडेखोरांना गुन्हे शाखेने पकडले. त्यांच्याकडून देशी बनावटीचे पिस्तुल जप्त करण्यात आले. आतापर्यंत या प्रकरणात अटक केलेल्या दरोडेखोरांची संख्या १० झाली आहे. याप्रकरणी एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच संतोष बाळू पवार (वय २३), साई राजेंद्र कुंभार (वय १९, रा. पानशेत रस्ता, खानापूर, ता. हवेली) अशी अटक करण्यात आली आहेत.

गेल्या आठवड्यात मार्केट यार्डातील कुरिअर कंपनीच्या कार्यालयात गोळीबार करुन दरोडेखोरांनी २७ लाख रुपयांची रोकड लुटली होती. पवार आणि कुंभार यांचा शोध घेण्यात येत होता. पवार आणि कुंभार यांनी गोळीबार करण्यासाठी वापरलेले पिस्तुल एका अल्पवयीन मुलाकडे ठेवण्यासाठी दिले होते. पोलिसांच्या पथकाने पवार, कुंभार यांना सापळा लावून पकडले. चौकशीत गोळीबार करण्यासाठी वापरलेले पिस्तुल अल्पवयीन मुलाकडे दिल्याचे उघडकीस आले. पोलिसांनी अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले.

पोलीस उपायुक्त अमोल झेंडे, सहायक आयुक्त गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अनिता मोरे, उपनिरीक्षक अजितकुमार पाटील, संतोष क्षीरसागर, रामदास गाेणते, शरद वाकसे, किरण पवार आदींनी ही कारवाई केली.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *