
पुणे : धान्य-भाजीपाल्याची आवक, वाढलेली रहदारी आणि वाहतुकीची कोंडी यामुळे आता गु लटेकडी येथील मार्केट यार्डचे पुन्हा स्थलांतर करण्याची वेळ आली आहे का? असा प्रश्न माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी रविवारी (२२ मे) उपस्थित केला. सध्याची जागा पुरेशी पडत नसेल तर उद्याचा विचार करून सर्वसहमतीने मार्ग काढण्याची वेळ आली आहे, असेही पवारांनी सांगितले. दि पूना मर्चंटस चेंबरच्या वतीने ‘व्यापाराचे विद्यापीठ‘ या पुस्तकाचे प्रकाशन शरद पवार यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते.
मी राज्याचा प्रमुख असताना १९७८ मध्ये नाना-भवानी पेठ येथील बाजारपेठ मार्केट यार्ड येथे हलविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. दि पूना मर्चंटस चेंबरचे त्यावेळचे अध्यक्ष उत्तमचंद ऊर्फ बाबा पोकर्णा यांच्या नेतृत्वाखाली व्यापाऱ्यांनी या निर्णयाला समर्थन दिले होते, अशी आठवण पवार यांनी जागविली. स्थलांतरामुळे व्यापार वाढला, पण आता येथे होत असलेली आवक, वाढती रहदारी आणि वाहतूक कोंडी यामुळे पुन्हा विचार करण्याची वेळ आली आहे का? असा सवाल त्यांनी व्यापाऱ्यांना केला.
व्यापार आणि उद्योग क्षेत्रात कार्यरत टाटा उद्योगसमूह, वालचंद हिराचंद, बजाज, किर्लोस्कर, कल्याणी या कुटुंबांच्या कार्याचा दाखला पवार यांनी आपल्या भाषणात दिला. या सर्वांनी शून्यातून सुरुवात केली. कष्ट, प्रामाणिकपणा, ग्राहकांप्रती बांधिलकी ही भूमिका अंतःकरणात ठेवून या सर्वांनी आपला उद्योग विस्तारला. संकटाच्या काळात नफा न घेता सर्वांनी राज्याच्या प्रगतीमध्ये आपले योगदान दिले. हेच ध्येय डोळ्यासमोर ठेवून सर्वांनी वाटचाल करावी, असे आवाहन पवार यांनी यावेळी केले.
“ज्यांचा सन्मान करण्यात आला त्या यादीवर नजर टाकली तर बहुतांश जण ‘बीएमसीसी’ या एकाच महाविद्यालयाचे विद्यार्थी असल्याचे ध्यानात येते. आपल्यावर संस्कार करून जीवनामध्ये यशस्वी करणाऱ्या महाविद्यालयातील युवा पिढीतील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती सुरू करण्यासाठी पुढाकार घ्यावा. या उपक्रमाला प्रोत्साहन देण्यासाठी स्वतःची मदत म्हणून मी पाच लाख रुपये जाहीर करतो,” अशी घोषणाही शरद पवार यांनी केली.
उत्तमशेठ पोकर्णा यांच्या मार्गदर्शनाखाली चार वर्षे काम करण्याची संधी मिळाली. ती पुंजी मला आयुष्यभर पुरत आहे, अशी भावना विठ्ठल मणियार यांनी व्यक्त केली. सहा वर्षात दोन पदव्या मिळाल्या. पण, उत्तरीय परिधान करून छायाचित्र टिपून घेण्यासाठी साठ वर्षे वाट पाहावी लागली, अशी नर्मविनोदी टिप्पणी त्यांनी केली.
प्रसिद्ध उद्योजक संजय घोडावत, चेंबरचे अध्यक्ष राजेंद्र बाठिया, उपाध्यक्ष अजित बोरा, सचिव रायकुमार नहार, सहसचिव ईश्वर नहार आणि माजी अध्यक्ष प्रवीण चोरबेले या वेळी उपस्थित होते. पवार यांच्या हस्ते राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॅा. बाबा आढाव, उद्योजक विठ्ठल मणियार, पणन संचालक सुनील पवार, ज्येष्ठ व्यापारी वालचंद संचेती, पोपटलाल ओस्तवाल, कन्हैयालाल गुजराथी, जयराज ग्रुपचे जयराज शहा, जितोचे विजय भंडारी, कोहिनूर ग्रुपचे कृष्णकुमार गोयल, अभय छाजेड, राजकुमार चोरडिया, विलास भुजबळ, श्याम अगरवाल, राजेंद्र गुगळे, ॲड. एस. के. जैन, अजित सेठिया, राजेश सांकला, राजेश फुलफगर, मोहन ओसवाल, राजेंद्र बोरा, प्रकाश पारख, हर्षकुमार बंग, राजेंद्र चांडक यांना ‘मास्टर ऑफ बिझनेस’ या पदवीने सन्मानित करण्यात आले.
विद्याधर अनास्कर आणि राजेश शहा यांनी मनोगत व्यक्त केले. बाठिया यांनी प्रास्ताविक केले. बोरा यांनी आभार मानले. सुधीर गाडगीळ यांनी सूत्रसंचालन केले.
शहर
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
महाराष्ट्र
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- इराण-इस्रायल संघर्षात मुंबईच्या खलाशाचा बळी; सोळंकी कुटुंबावर महिन्याभरात दुसरे दुःख
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- Pune Crime : वहिनीवर घरातच अत्याचार; 43 वर्षीय चुलत दिराला 10 वर्षांची सक्तमजुरी, बारामती न्यायालयाचा निकाल
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले
- त्वचेला नैसर्गिक चमक हवी? बीटच्या साध्या उपायांनी मिळवा गुलाबी आणि निरोगी कांती!
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
देश विदेश
- Health - साधी डाळ बनवा चविष्ट: ५ झणझणीत तडके देण्याची सोपी कृती जाणून घ्या
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती



























Subscribe to my channel


