पुणे : मातोश्री काय मशिद आहे का? राज ठाकरेंचा राणा दाम्पत्याला टोला

पुणे: मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची आज पुण्यात सभा होत आहे. गुढीपाडव्याची सभा त्यानंतर ठाण्यातील उत्तर सभा, औरंगाबादमधिल सभा झाल्यांनतर आज राज ठाकरे पुण्यामध्ये कार्यकर्त्यांना संबोधित करत आहेत. राज ठाकरे कोणत्या विषयावरती बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. आगामी महापालिका निवडणुकांच्या दृष्टीने राज ठाकरेंनी आजची सभा महत्त्वाची असणार आहे. सबंध महाराष्ट्रतून मनसैनिक पुण्यात आले आहेत. राज ठाकरेंनी यावेळी राणा दाम्पत्यावरती टीका केली. मी मशिदीसमोर जाऊन हनुमान चालीसा वाजवा असे सांगितले होते. परंतु राणा दाम्पत्याने मातोश्री समोर जाऊन हनुमान चालीसा वाचायचे ठरवले, आता मातोश्री काय मशिद आहे का? असा प्रश्न राज ठाकरेंनी विचारला आहे. राणा दाम्पत्याच्या प्रकरणात काय झाले हे सर्वांनी पाहिले. परंतु नंतर संजय राऊत आणि राणा दाम्पत्य लडाखमध्ये एकत्र दिसले हे पाहून शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना काहीच वाटत नाही का? असाही सवाल राज ठाकरेंनी केला.  यावेळी राज ठाकरेंनी भाषणाला सुरुवात करण्याअगोदर सभेला आलेल्या अंध विद्यार्थांना मंचावर बोलवून त्यांना पहिल्या रांगेत बसण्याची परवानगी देवून राज ठाकरेंनी सर्वांची मने जिंकली आहेत. यावेळी बोलताना राज ठाकरेंनी अयोध्या दौरा रद्द का केला याचे उत्तर दिले. राज ठाकरे म्हणाले की अयोध्या ट्रॅप आहे हे माझ्या लक्षात आलं. कारसेवकांना ठार मारले गेलं होतं. कार सेवकांच्या त्या ठिकाणाचं दर्शन घ्यायचं होतं. मी अट्टाहास करुन गेलो असतो तर तुमच्यावर केसेस टाकल्या गेल्या असत्या, तुम्हांला जेल मध्ये सडवलं गेलं असतं. दरम्यान मागच्या काही काळात राज ठाकरेंनी मशिदीवरील भोंग्यासंदर्भात घेतलेल्या भूमिकेवरुन मनसे कार्यकर्त्यांची धरपकड झाली होती. त्याचबरोबर राज ठाकरेंनी नियोजीत अयोध्या दौराही रद्द केला आहे. मशिदीवरील भोंग्यांसदर्भात घेतलेल्या भूमिकेमुळे राज्यभरातील अनेक मुस्लीम पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला होता. वसंत मोरे यांनीही भोंग्यांबाबतीत घेतलेल्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली होती त्यामुळे त्यांना शहर अध्यक्ष पदावरुन पायउतार व्हावा लागले होते.


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply