
पुणे : महाराष्ट्रातील जनतेच्या आशीर्वादाने मला राज्याचं नेतृत्व करण्याची संधी मिळाली आहे. मुख्यमंत्री म्हणून मी राज्यातील जनतेला न्याय देण्यासाठी आणि महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. राज्यातील सर्वसामान्य लोकांच्या जीवनामध्ये चांगले दिवस यावेत, यासाठी माझा प्रयत्न असणार असल्याची ग्वाही यावेळी त्यांनी दिली.
मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पहिल्यांदाच विठुरायाची महापूजा होणार आहे. विठुरायाच्या दर्शनासाठी जात असताना, हडपसर भागातील शिवसेनेचे माजी नगरसेवक नाना भानगिरे यांनी गाडीतळ येथे त्यांचं जंगी स्वागत केले. यावेळी शिवसेनेचे माजी मंत्री विजय शिवतारे, शिवसेना नेते अजय भोसले, शिवसेना नेते किरण साळी यांच्यासह आजी-माजी पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले की, ‘मी आणि आमचे २० आमदार अशा सर्वांनी बाळासाहेबांच्या हिंदुत्वाची भूमिका स्वीकारली आहे. तसेच धर्मवीर आनंद दिघे साहेब यांची शिकवण आम्ही पुढे घेऊन जात आहोत. आपल्या सर्वांना बाळासाहेबांचे हिंदुत्व माहिती आहे. आता या राज्याला प्रगतीपथाकडे घेऊन जाण्यासाठी, सुजलाम्-सुफलाम् करण्यासाठी जे काही करता येईल, ते आम्ही निश्चितपणे करणार आहोत. किंबहुना आमचा तसा प्रामाणिक प्रयत्न राहणार आहे.’
‘दिल्ली येथे राष्ट्रपती, पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच गृहमंत्री यांची मी भेट घेऊन आलो आहे. त्यावेळी इतर मंत्र्यांचीदेखील भेट झाली. महाराष्ट्राच्या विकासासाठी केंद्र सरकार पूर्णपणे पाठिंबा देईल, असे आश्वासन या भेटींमध्ये मिळाल्याचे शिंदे म्हणाले.
‘अमरनाथ येथील यात्रेमध्ये आपल्या राज्यातील तीन नागरिकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे कुठेही ढोल-ताशा वाजवू नका,’ असे आवाहन उपस्थित कार्यकर्त्यांना करीत मुख्यमंत्र्यांनी मृतांना श्रध्दांजली वाहिली. आषाढी एकादशी निमित्ताने मुख्यमंत्र्यांना पंढरपूर येथे पोहचायचे आहे. त्यामुळे त्यांनी उपस्थित कार्यकर्ते आणि आठवले गटाचे आभार मानून प्रस्थान केले.
शहर
- २०२६ मध्ये यूट्यूबवर यशस्वी व्हायचेय? सबस्क्राईबर्स वाढवून महिन्याला लाखो कमवण्यासाठी ५ प्रभावी टिप्स.
- छत्तीसगड हादरले! भाजप नेत्याचा मृतदेह मंदिर परिसरात झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळला; परिसरात खळबळ.
- राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी: 'फार्मर आयडी' म्हणजे काय आणि आतापर्यंत किती शेतकऱ्यांनी केली नोंदणी?
- प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! पुणे-नागपूर वंदे भारत एक्स्प्रेसची क्षमता दुप्पट होणार; ८ ऐवजी १६ डब्यांचा प्रस्ताव सादर.
महाराष्ट्र
- छत्तीसगड हादरले! भाजप नेत्याचा मृतदेह मंदिर परिसरात झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळला; परिसरात खळबळ.
- राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी: 'फार्मर आयडी' म्हणजे काय आणि आतापर्यंत किती शेतकऱ्यांनी केली नोंदणी?
- प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! पुणे-नागपूर वंदे भारत एक्स्प्रेसची क्षमता दुप्पट होणार; ८ ऐवजी १६ डब्यांचा प्रस्ताव सादर.
- अमरावतीत रक्ताच्या नात्याला काळीमा! अनैतिक संबंधांतून पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीला संपवले; मृतदेह पाण्याच्या टाकीत फेकून रचला हत्येचा कट!
गुन्हा
- कल्याण हादरलं! हुंड्यासाठी विवाहितेचा अमानुष छळ; सासरच्या मंडळींनी केलं चक्क टक्कल.
- ८ वर्षांचे प्रेम, लग्न ठरले आणि २४ तासांतच घात झाला! प्रेयसीच्या नातेवाईकांकडून तरुणाची निर्घृण हत्या.
- पंढरपुरात थरकाप! किरकोळ वादातून रिक्षाचालकाची निर्घृण हत्या; हत्येनंतर मारेकऱ्यांनी घराच्या दरवाजाला टाकला कापलेला पाय!
- ज्ञानमंदिरांच्या दारातच नशेचा बाजार! राजगुरुनगरात शाळा-महाविद्यालयांजवळ गुटखा, सिगारेटची खुलेआम विक्री.
राजकीय
- नवी मुंबईत युतीमधील संघर्ष पेटला! शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांकडून गणेश नाईकांच्या ताफ्याला रोखण्याचा प्रयत्न; राजकीय वातावरण तापले
- 'टीएमसी' कुणाची? ममता बॅनर्जींच्या पक्षात फूट; बंडखोर खासदारांची आता पक्षाचे नाव आणि चिन्हावर दावा करण्याची तयारी!
- चंद्रपूर काँग्रेसमध्ये राजकीय वादळ; धानोरकर-वडेट्टीवार यांच्या दोन 'व्हीप'मुळे नगरसेवक संभ्रमात!
- विधान परिषद निवडणुकीत पुन्हा 'हॉटेल पॉलिटिक्स'चा खेळ; दगाफटका टाळण्यासाठी महायुतीकडून नगरसेवकांचे 'ऑपरेशन ठाणे'!
इतर
- आता डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय मिळणार नाही 'कफ सिरप'; केंद्र सरकारचा मोठा निर्णय.
- आजचे राशिभविष्य १६ जून २०२६: आज कोणावर होईल हनुमानाची कृपा? वाचा सविस्तर!
- पंचांग १५ जून २०२६: पुरुषोत्तम मास समाप्तीसह बुधादित्य आणि त्रिग्रही योग; जाणून घ्या आजचे शुभ मुहूर्त!
- आजचे राशिभविष्य १४ जून २०२६: बाप्पा आणि हनुमानजींच्या कृपेने कोणत्या राशींचे नशीब चमकणार? जाणून घ्या तुमची रास काय सांगते!
मनोरंजन
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
- 'आली लखाबाई' गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ; अमृता धोंगडेच्या रौद्र रूपाने आणि दमदार नृत्याने प्रेक्षकांना केले मंत्रमुग्ध.
विडियो गॅलेरी

देश विदेश
- हैदराबाद: २ कोटींच्या विम्यासाठी पतीचा काटा काढला; FSL रिपोर्टही 'मॅनेज' केला, पण अखेर सत्य बाहेर आलेच!
- नवी मुंबई विमानतळाचा जागतिक स्तरावर डंका! 'प्रिक्स व्हर्सायल्स'च्या यादीत समावेश; जगातील सर्वात सुंदर विमानतळांपैकी एक!
- अमेरिका: वायू दलाचे शक्तिशाली 'B-52 बॉम्बर' विमान कोसळले; ८ जणांचा होरपळून मृत्यू.
- जेरुसलेम: करार असो किंवा नसो, इराणला अणुबॉम्ब बनवू देणार नाही": अमेरिकेच्या इराणसोबतच्या करारानंतर बेंजामिन नेत्यानाहू यांचे खणखणीत विधान.


























Subscribe to my channel




