पुणे : महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागातील लाचखोर अभियंते जाळ्यात

पुणे : पाणी वाहतूक करणाऱ्या टँकर व्यावसायिकाकडे २० हजारांची लाच घेणाऱ्या पुणे महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागातील उपअभियंत्यासह कनिष्ठ अभियंत्याला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) सोमवारी पकडले.

या प्रकरणी पाणी पुरवठा विभागातील उपअभियंता मधुकर दत्तात्रय थोरात (वय ५६), कनिष्ठ अभियंता अजय भारत मोरे (वय ३७) यांच्या विरोधात कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत टँकरने पाणी पुरवठा करणाऱ्या व्यावसायिकाने फिर्याद दिली आहे. थोरात आणि मोरे महापालिकेच्या बंडगार्डन पाणी पुरवठा विभागात नियुक्तीस आहेत. टँकर मार्फत पाणी पुरवठा करणाऱ्या व्यावसायिकाना पाणी पुरवठा विभागातून परवाना घ्यावा लागतो. प्रत्येक टँकर भरताना एक परवाना सादर करावा लागतो.

Follow us -

दर दिवशी पाचपेक्षा जास्त टँकर भरून पाहिजे असल्यास दरमहा वीस हजार रुपये द्यावे लागतील, असे कनिष्ठ अभियंता मोरे यांनी सांगितले. त्यानंतर व्यावसायिकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने तक्रारीची पडताळणी करुन थोरात, मोरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. पोलीस अधीक्षक राजेश बनसाेडे, अतिरिक्त अधीक्षक सूरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. पोलीस निरीक्षक संदीप कुऱ्हाडे तपास करत आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply