पुणे : महापालिकेच्या अभय योजनेचा लाभ घेणाऱ्यांनी पुन्हा थकविले १५० कोटी

पुणे - महापालिकेने मिळकतकराची थकबाकी वसूल (Arrears Recovery) करण्यासाठी २०२०-२१ मध्ये अभय योजना राबविली होती. यामध्ये दीड लाख थकबाकीदारांनी लाभ घेतला. मात्र त्यापैकी ४५ हजार ७४५ जणांनी २०२१-२२ मध्ये पुन्हा तब्बल १५१ कोटी रुपयांची थकबाकी निर्माण केली आहे. त्यामुळे वारंवार कर बुडविणाऱ्या मिळतकधारकांना अभय योजनेत दिलेली दंड माफीची सवलत रद्द करा अशी मागणी सजग नागरिक मंचाने केली आहे.

महापालिकेने वर्षानुवर्षे थकबाकी न भरणाऱ्या नागरिकांसाठी २०२०-२१ मध्ये अभय योजना घोषित केली. त्यात दंडाची ७५ टक्के रक्कम माफ करण्यात आली. तर मुळ थकबाकी आणि २५ दंड भराव लागणार होता. या योजनेत १लाख ४९ हजार ७०० थकबाकीदारांनी सुमारे साडे चारशे कोटीचा कर भरला होता. आता या सर्व मालमत्ताधारकांनी गेल्या वर्षी २०२१-२२ वेळेवर मालमत्ता कर भरला आहे का याची घेतली असता धक्कादायक वास्तव समोर आले आहे.

अभय योजनेत १ लाख १९ हजार २७२ निवासी मिळकतधारकांनी लाभ घेतला होत. पण त्यातील ३६ हजार २२९ नागरिकांनी पुन्हा २०२१-२२ मध्ये ४० कोटीची थकबाकी निर्माण केली. २३ हजार ३२ बिगरनिवासी मिळकतधारकानी अभय योजनेत सहभाग घेतला, त्यापैकी ७ हजार १५४ जणांनी २०२१-२२ मध्ये ९७ कोटीची थकबाकी केली. मोकळ्या जागांसाठी ३ हजार १४८ जणांनी अभय योजनेचा लाभ घेतला, त्यापैकी पुन्हा ९४५ जणांनी ७ कोटी रुपये थकविले आहेत. तर मिश्र वापर असलेल्या ४ हजार २५६ मिळकतधारकांनी अभय योजनेचा फायदा घेतला होता. त्यापैकी १ हजार ४१८ जणांनी सात कोटी रुपये थकविले. अशा प्रकारे एकूण ४५ हजार ७४५ जणांनी १५१ कोटी रुपये थकविले आहेत.

‘अभय योजना म्हणजे प्रामाणिकपणे कर भरणाऱ्यांवर अन्याय आहे. या अभय योजनेचा फायदा घेऊन ज्यांनी पुन्हा कर थकविला आहे, त्यांना दिलेली ७५ टक्क्यांची सवलत रद्द करा व ही रक्कम वसूल करा. तसेच भविष्यात अभय योजनेचा फायदा त्यांना पुन्हा दिला जाऊ नये.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply