पुणे : बेकायदा वास्तव्य करणाऱ्या सहा येमेनी नागरिकांची हकालपट्टी; पुणे पोलिसांच्या विशेष शाखेची कारवाई

पुणे : शहरात गेले पाच वर्ष बेकायदा वास्तव्य करणाऱ्या येमेन देशातील सहा जणांची पुणे पोलिसांच्या विशेष शाखेकडून हकालपट्टी करण्यात आली आहे. सहा जणांमध्ये तीन अल्पवयीन मुलांचा समावेश असून त्यांची रवानगी येमेनमध्ये करण्यात आली आहे.अलखराज वालेद अब्दुराबुअतेह (वय ३७), साउदी अब्दुरबू अतेक अल खराज (वय ३४), हेबायाहना मोहम्मंद हुसेन (वय ३३) यांच्यासह तीन अल्पवयीन मुलांची रवानगी येमेनमध्ये करण्यात आली आहे. सहा जण विद्यार्थी व्हिसावर २०१७ मध्ये शहरात शिक्षणासाठी आले होते. कोंढव्यात ते वास्तव्य करत होते. व्हिसाची मुदत संपल्यानंतर ते बेकायदा वास्तव्य करत होते. ऑक्टोबर महिन्यात विशेष शाखेच्या परकीय नागरिक नोंदणी विभागाने (एफआरओ) त्यांना ताब्यात घेतले होते. याबाबतची माहिती येमेनमधील दुतावासाला देण्यात आली होती. त्यांना येमेनमध्ये पाठविण्याची कारवाई सुरू करण्यात आली होती.

या कारवाईस सहा येमनी नागरिकांनी विरोध केला होता. त्यांनी लष्कर न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळून लावली. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळून लावली. त्यानंतर येमेनमधील नागरिक मायदेशात जाण्यास तयार नव्हते. येमेनमधील दुतावासाच्या सहकार्याने पोलिसांनी त्यांची विमान तिकिटे आरक्षित केली. २४ डिसेंबर रोजी विमानाने त्यांना मायदेशी पाठविण्यात आले.
पोलीस आयुक्त रितेश कुमार, सहपोलीस आयुक्त संदीप कर्णिक, विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त आर. राजा, सहायक पोलीस आयुक्त नियती ठाकरदवे, रमाकांत माने, भुपेश बावनकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर, सहायक पोलीस निरीक्षक पंकज पवार, पॉल अ‍ॅन्थनी, शैलेंद्र वाणी, दिलीप काची आदींनी ही कारवाई केली.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply