पुणे : बनावट एनए ऑर्डर, भोगवटा प्रमाणपत्राच्या आधारे दस्त नोंदणी प्रकरणांची नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने गंभीर दखल घेतली असून, यामध्ये दोषी असणाऱ्या अधिकाऱ्यांवर निलंबनाची व फौजदारी गुन्हे दाखल करण्याची कारवाई केली जाणार आहे.वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांच्या नावाने बनावट कागदपत्रे सादर करून दस्तनोंदणी केल्याचा प्रकार उघडकीस आला होता. त्यानंतर नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने तपासणी मोहीम हाती घेतली.
त्यामध्ये दुय्यम निबंधक कार्यालय क्रमांक ३ येथे मागील पाच महिन्यांत नोंदविलेल्या एक हजार ४७२ दस्तांची तपासणी केली असता सुमारे ११२ दस्त बोगस एनए ऑर्डर, बोगस भोगवटा प्रमाणपत्राच्या आधारे नोंदविल्याचे आढळले. त्यामुळे बोगस कागदपत्रांच्या आधारे दस्त नोंदविणाऱ्यांवर गुन्हे दाखल करून त्या कारवाईचा अहवाल सादर करण्याच्या सूचना नोंदणी विभागाने दिल्या आहेत. त्यानुसार बोगस कागदपत्रे दाखवून सदनिकांची खरेदीदार व विक्री करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरु केली आहे.
सात प्रकरणांमध्ये तीन व्यक्तींवर हडपसर पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला आहे. परंतु, एवढ्यावर न थांबता या प्रकरणात दोषी असलेल्या अधिकाऱ्यांवरही कारवाई करण्याचा निर्णय नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने घेतला आहे.
संबंधित प्रकरणांची चौकशी सुरू आहे. त्यामध्ये कोणी अधिकारी दोषी आढळला तर त्याच्यावर निलंबनाची कारवाई करून गुन्हे दाखल केले जाणार आहेत.
शहर
महाराष्ट्र
- Eknath Shinde : पुन्हा महायुतीचं सरकार आल्यास मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देणार? एकनाथ शिंदे म्हणाले…
- Maharashtra :“अनिल देशमुखांनी स्वत:च स्वत:वर हल्ला करुन घेतला”; भाजपा आमदाराचा गंभीर आरोप; म्हणाले…
- ‘Manoj Jarange Patil on Kalicharan Maharaj : हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे पाटील यांचे जोरदार प्रत्युत्तर; म्हणाले, “टिकली लावलेला…”
- Satara : पाडा पाडा म्हणणाऱ्या पवारांचे उमेदवारच लोक पाडतील; उदयनराजे यांचे टीकास्त्र
गुन्हा
- Pune : जमिनीच्या वादातून चुलत भावाला मोटारीखाली चिरडण्याचा प्रयत्न, शिरुरमधील केंदूर गावातील घटना
- Pune : गुंतवणुकीच्या आमिषाने ज्येष्ठ नागरिकाची दोन कोटींची फसवणूक, वरद प्राॅपर्टीजच्या संचालकांविरुद्ध गुन्हा
- Pune Crime : पुण्यातील चितळे बंधूंच्या दुकानावर दरोडा; चोरीची घटना CCTV कॅमेऱ्यात कैद
- Pune Crime : दांडेकर पूल परिसरात प्रेमप्रकरणातून तरुणाचा खून, शहरात दोन दिवसात तीन खून
राजकीय
- Maharashtra Politics : विधानसभेपूर्वी मुंबईत काँग्रेसला मोठा धक्का, रवी राजा यांनी भाजपमध्ये केला प्रवेश
- Maharashtra Politics : किशोर जोरगेवार यांचा अखेर भाजपामध्ये प्रवेश, विरोध करणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांनीच केलं स्वागत
- Maharashtra Politics : मुंबई, नांदेडनंतर पुण्यात ठाकरे गटात नाराजी; इच्छुक बंडखोरीच्या तयारीत
- NCP Candidate List : अजित पवारांच्या राष्ट्रवादीची तिसरी यादी जाहीर, नवाब मलिक यांच्या नावाची घोषणा नाहीच
इतर
- Aastad Kale : 'राजन नावाचे क्रिमिनल आहेतच की', मुलाचं नाव जहांगीर ठेवल्यामुळे चिन्मय मांडलेकरच्या ट्रोलिंगवर आस्ताद काळेचं स्पष्ट मत
- Ashok Saraf : नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार अभिनेते अशोक सराफ व रोहिणी हटंगडी यांना जाहीर
- Neena Gupta Interview : 'पैशांसाठी मी तशा भूमिका केल्या, देवाकडे प्रार्थना करायची की...' अभिनेत्रीने स्ट्रगलच्या दिवसांतील मांडली व्यथा
- Munawar Faruqui : 'बिग बॉस १७' विनर मुनव्वर फारुकीची प्रकृती बिघडली, रुग्णालयात उपचार सुरू; नेमकं काय झालं?
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- Shashi Tharoor On Delhi : “दिल्ली देशाची राजधानी राहावी का?” शशी थरूर यांचं थेट मुद्द्यावर बोट, म्हणाले, “या शहरात…”
- Desh Videsh : मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याबद्दल नायजेरियातील मराठी भाषिकांनी मानले पंतप्रधान मोदींचे आभार
- New Delhi : दत्तक मूल तीन महिन्यांपेक्षा मोठे असल्याने मातृत्व रजा नाकारली ; सर्वोच्च न्यायालयाने केंद्राकडे मागितले उत्तर
- Lucknow : ‘बुलडोझर दहशत’, ‘जंगल राज’ संपेल! निकालाचे विरोधी पक्षांकडून स्वागत; सरकारची सावध प्रतिक्रिया