पुण्यात बनावट मतदार ओळखपत्र आणि पॅनकार्ड बनवून देणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी बुलढाण्यातील रहिवासी असणाऱ्या एका आरोपीला अटक केली आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधीपथकानं सापळा रचून पुणे रेल्वे स्टेशन परिसरातून आरोपीला जेरबंद केलं आहे. पोलिसांनी आरोपीकडून दहा बनावट मतदार ओळखपत्रजप्त केली आहेत. यावेळी पोलिसांना आरोपीच्या संगणकात देखील अनेक बनावट मतदार ओळखपत्र आणि पॅनकार्ड आढळली आहेत.
कल्पेश रमेश बोहरा (वय ४२, रा. नम्रता सदन, खामगाव, जि. बुलढाणा) असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे. याबाबत गुन्हे शाखेतील खंडणी विरोधी पथकातील कर्मचारी मधुकर तुपसौंदर यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. आरोपी बोहरा हा जमीन खरेदी विक्रीचे व्यवहार करतो. तसेच तो नागरिकांना बनावट मतदार ओळखपत्र आणि पॅनकार्ड तयार करून देण्याच काम करत होता. बनावट मतदार ओळखपत्र आणि पॅनकार्ड तयार करून देण्यासाठी तो पैसे घ्यायचा. याबाबतची माहिती खंडणी विरोधी पथकाला मिळाल्यानंतर पोलिसांनीसापळा रचून त्याला अटक केली आहे.
आरोपी बोहरा याच्याकडे पोलिसांना वेगवेगळ्या व्यक्तीच्या नावाची दहा बनावट मतदार ओळखपत्रं आढळली आहेत. यावेळी पोलिसांनी त्याच्याकडून संगणक जप्त केला असून त्यामध्ये देखील बनावट मतदार ओळखपत्र, पॅनकार्ड तसेच काहीजणांची छायाचित्रे आढळून आली आहेत. आतापर्यंत आरोपीनं अनेक नागरिकांना बेकायदेशीरपणे बनावट मतदार कार्ड आणि पॅनकार्ड बनवून दिल्याची शंका पोलिसांना आहे. या घटनेचा पुढील तपास बंडगार्डन पोलीस करत आहेत.
आरोपी बोहरा बनावट मतदार ओळखपत्र तयार करण्यासाठी प्रत्येकी दहा हजार रुपये घेत होता, अशी प्राथमिक माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. या घटनेचा पुढील तपास खंडणी विरोधी पथकातील पोलीस उपनिरीक्षक जाधव करत आहेत.
शहर
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
महाराष्ट्र
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- इराण-इस्रायल संघर्षात मुंबईच्या खलाशाचा बळी; सोळंकी कुटुंबावर महिन्याभरात दुसरे दुःख
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- Pune Crime : वहिनीवर घरातच अत्याचार; 43 वर्षीय चुलत दिराला 10 वर्षांची सक्तमजुरी, बारामती न्यायालयाचा निकाल
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले
- त्वचेला नैसर्गिक चमक हवी? बीटच्या साध्या उपायांनी मिळवा गुलाबी आणि निरोगी कांती!
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
विडियो गॅलेरी

देश विदेश
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले


























Subscribe to my channel
