पुणे प्रादेशिक विभाग महावितरण कर्जबाजारी; कृषिपंप शेतकऱ्यांनी थकवली तब्बल १२०३९ केटींची थकबाकी

पुणे प्रादेशिक विभागात अनेक शेतकरी आहेत. पुणे, सातारा, सोलापूर, सांगली आणि कोल्हापूर अशा पाचही जिल्ह्यांमध्ये भरगोस उत्पन्न घेणारे शेतकरी आहेत. यात अनेकांच्या फळबागा असल्याने कृषीपंपाचा वापरही जास्त प्रमाणात दिसून येतो. या भागातील सर्वच शेतकरी १२ ही महिने शेतात पिक घेतात. अनेकांसाठी उदनिर्वाहाचा हाच एक पर्याय आहे आणि याच शेतीवर त्यांनी बंगले, कार अशा विविध सुख सुविधा मिळवल्या आहेत. मात्र तरी देखील यातील १२ लाख ५४ हजार कृषीपंप शेतकऱ्यांकडे ७९०२ कोटी रुपयांची वीज बिल थकबाकी आहे.

 
शेतकऱ्यांनी वेळेवर बिल न भरल्याने याचा संपूर्ण भार महावितरणावर आला आहे. मागिल काही वर्षांत थकबाकीचे हे प्रमाण वाढलेले आहे. याने महावितरणचे सर्व आर्थिक गणित विस्कळीत झाले आहे. शेतकऱ्यांनी वेळेवर बिल न भरल्यास महावितरणावर असलेला कर्जाचा भार आणखीन वाढण्याची शक्यता आहे. प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत वीज पोहचवण्यासाठी महावितरणला वीज उत्पादकांना रोजचे पैसे द्यावे लागतात. त्यामुळे महावितरण वारंवार कृषी पंप ग्राहकांना थकीत बिल भरण्याचे आवाहन करत आहेत.


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply