पुणे : दिवाळीत प्रवाशांची मागणी लक्षात घेता राज्य परिवहन महामंडळाकडून (एसटी) पुणे-नागपूर मार्गावर १९ ऑक्टोबरपासून शिवनेरी व्हॉल्व्हची जादा फेरी सोडण्यात येणार आहे. एसटीच्या वाकडेवाडी येथील स्थानकातून ही गाडी सोडण्यात येणार आहे. पुणे आणि नागपूर या दोन्ही बाजूने २३ ऑक्टोबरपर्यंत जादा गाडी धावणार असल्याचे एसटीच्या पुणे विभागाकडून सांगण्यात आले.
दिवाळीमध्ये पुण्यातून सर्वाधिक मागणी विदर्भात जाण्यासाठी असते. त्यात नागपूर आणि अमरावती भागांत जाणारे प्रवासी सर्वाधिक असतात. या मार्गावर खासगी प्रवासी गाड्यांनाही मोठी मागणी असते. दिवाळीच्या कालावधीत काही खासगी वाहतूकदार मनमानी पद्धतीने भाडेवसुली करीत असल्याच्या तक्रारीही दरवर्षी होतात. प्रवाशांची मागणी लक्षात घेता एसटीकडूनही जादा गाड्या उपलब्ध करून देण्यात येतात. त्यानुसार १९ ऑक्टोबरपासून एक जादा गाडी जाहीर करण्यात आली आहे.
वाकडेवाडी (शिवाजीनगर) ते नागपूर ही गाडी १९ ते २३ ऑक्टोबर या कालावधीत संध्याकाळी पाच वाजता वाकडेवाडी स्थानकातून सोडण्यात येईल. २० ते २४ ऑक्टोबर या कालावधीत नागपूरहून वाकडेवाडीसाठी संध्याकाळी पाच वाजताच गाडी सोडण्यात येणार आहे. या प्रवासासाठी प्रौढांना २४१५ रुपये, तर मुलांना १२१० रुपये भाडे आकारणी केली जाणार आहे. दोन्ही बाजूच्या गाड्यांचे आरक्षण सुरू करण्यात आले असून, त्यासाठी शिवाजीनगरचा सांकेतिक क्रमांक ‘एसएनजीआर’, तर नागपूरचा सांकेतिक क्रमांक ‘एनजीपीसीबीएस’ असा आहे. या सेवेचा प्रवाशांनी लाभ घ्यावा, असे आवाहन एसटीच्या पुणे विभागाचे नियंत्रक रमाकांत गायकवाड यांनी केले आहे.
शहर
- Pune : पुण्यात होणार नव्याने प्रभाग रचना, काय आहे कारण ?
- BEST Workers Diwali Bonus : बेस्ट कर्मचाऱ्यांची आज दिवाळी, २९ हजारांचा बोनस खात्यात होणार जमा
- Pune : महायुती तुटणार, प्रत्येक पक्ष आता स्वतंत्र लढणार ? सहा महिन्यांत निवडणुकांची शक्यता
- Pune : तडीपार गुंडाकडून पिस्तुलासह अमली पदार्थ जप्त, कात्रज भागात कारवाई
महाराष्ट्र
- BEST Workers Diwali Bonus : बेस्ट कर्मचाऱ्यांची आज दिवाळी, २९ हजारांचा बोनस खात्यात होणार जमा
- Eknath Shinde Resign : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राजीनामा, राजभवनावर हालचालींना वेग
- Nagpur Accident : नागपूरमध्ये भीषण अपघात, ५२ विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी बस उलटली
- Maharashtra CM : मुख्यमंत्री कोण? अजितदादांचा देवेंद्र फडणवीसांना पाठिंबा, १७८ आमदार पाठिशी !
गुन्हा
- Pune : जमिनीच्या वादातून चुलत भावाला मोटारीखाली चिरडण्याचा प्रयत्न, शिरुरमधील केंदूर गावातील घटना
- Pune : गुंतवणुकीच्या आमिषाने ज्येष्ठ नागरिकाची दोन कोटींची फसवणूक, वरद प्राॅपर्टीजच्या संचालकांविरुद्ध गुन्हा
- Pune Crime : पुण्यातील चितळे बंधूंच्या दुकानावर दरोडा; चोरीची घटना CCTV कॅमेऱ्यात कैद
- Pune Crime : दांडेकर पूल परिसरात प्रेमप्रकरणातून तरुणाचा खून, शहरात दोन दिवसात तीन खून
राजकीय
- Maharashtra Politics : विधानसभेपूर्वी मुंबईत काँग्रेसला मोठा धक्का, रवी राजा यांनी भाजपमध्ये केला प्रवेश
- Maharashtra Politics : किशोर जोरगेवार यांचा अखेर भाजपामध्ये प्रवेश, विरोध करणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांनीच केलं स्वागत
- Maharashtra Politics : मुंबई, नांदेडनंतर पुण्यात ठाकरे गटात नाराजी; इच्छुक बंडखोरीच्या तयारीत
- NCP Candidate List : अजित पवारांच्या राष्ट्रवादीची तिसरी यादी जाहीर, नवाब मलिक यांच्या नावाची घोषणा नाहीच
इतर
- Aastad Kale : 'राजन नावाचे क्रिमिनल आहेतच की', मुलाचं नाव जहांगीर ठेवल्यामुळे चिन्मय मांडलेकरच्या ट्रोलिंगवर आस्ताद काळेचं स्पष्ट मत
- Ashok Saraf : नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार अभिनेते अशोक सराफ व रोहिणी हटंगडी यांना जाहीर
- Neena Gupta Interview : 'पैशांसाठी मी तशा भूमिका केल्या, देवाकडे प्रार्थना करायची की...' अभिनेत्रीने स्ट्रगलच्या दिवसांतील मांडली व्यथा
- Munawar Faruqui : 'बिग बॉस १७' विनर मुनव्वर फारुकीची प्रकृती बिघडली, रुग्णालयात उपचार सुरू; नेमकं काय झालं?
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
विडियो गॅलेरी
देश विदेश
- Desh Videsh : संविधान धर्मनिरपेक्षच! सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा; उद्देशिकेतील शब्दांवर आक्षेप घेणाऱ्या याचिका निकाली न्यायालयाची निरीक्षणे
- Uttar Pradesh : हिंसाचारात तीन ठार; उत्तर प्रदेशात मशिदीच्या सर्वेक्षणाला विरोध, जमावाचा पोलीसांशी संघर्ष
- Crime News : धक्कादायक! तरुणीच्या चेहऱ्यावर फासली मानवी विष्ठा, तोंडात कोंबून…; क्रूर कृत्याने खळबळ
- Shashi Tharoor On Delhi : “दिल्ली देशाची राजधानी राहावी का?” शशी थरूर यांचं थेट मुद्द्यावर बोट, म्हणाले, “या शहरात…”