पुणे: पैशांची चणचण, शेजारच्याचं अपहरण; आठ वर्षांच्या मुलाची डोक्यात दगड घालून हत्या

पुणे: पिंपरी-चिंचवड शहरात चिखली परिसरातील हरगुडे वस्तीत, रविवारी लक्ष्मण बाबूराम देवासी या आठ वर्षाच्या मुलाची डोक्यात दगड घालून कुणीतरी अज्ञात व्यक्तीने निर्घृण हत्या केली होती. मात्र लक्ष्मण देवासी याची हत्या नेमकी कुणी केली आणि कुठल्या कारणासाठी केला हे स्पष्ट झालं नव्हतं. पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुंडा विरोधी पथकाने लक्ष्मण देवासीच्या मारेकऱ्यांना शोधून काढल आहे. एक लाख रुपयांच्या खंडणीसाठी बपिल अहमद रइस या आरोपीने लक्ष्मण बापूराम देवासी याचं अपहरण करून त्याचा खून केला होता. असं पोलीस तपासात उघडकीस आल आहे.

लक्ष्‍मण बाबुराव देवासीचे वडील बाबूराम देवासी आणि आरोपी बपील अहमद रईस हे एकाच इमारती मध्ये राहायला असून, ते एकमेकांच्या ओळखीचे होते. मात्र बपील अहमद रइस ह्याला आर्थिक चणचण जाणवल्याने, त्यांने लक्ष्मण बाबूराम देवासी या आठ वर्षाच्या मुलाचं अपहरण करून त्याच्या वडिलांकडे एक लाख रुपये खंडणी मागण्याचा कट रचला होता. मात्र लक्ष्मण देवासी जेव्हा बपील अहमद रईस ह्यांच्या तावडीत असताना, आरडाओरडा केल्याने बपील अहमद रईस ह्याने लक्ष्मण बाबूराम देवासी याचा डोक्यात दगड घालून खून केला आहे असं पोलीस तपासात निष्पन्न झाल आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply