पुणे : पीडीसीसी बॅंकेकडून शैक्षणिक कर्ज मर्यादेत वाढ ;अजित पवार यांची माहिती

सध्या देशात महागाई प्रचंड वाढत आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी खूप अडचणी येत आहेत. या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या (पीडीसीसी) संचालक मंडळाने शैक्षणिक कर्ज मर्यादेत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

 याबाबत विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी माहिती दिली. ते म्हणाले, की देशात महागाई खूप वाढत आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी अडचणी येत आहेत. पालकांना आणि विद्यार्थ्यांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे बँकेच्या संचालक मंडळाने शैक्षणिक कर्जात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. आता देशांतर्गत शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना ३० लाखांपर्यंत कर्ज मिळणार आहे.

याआधी हे कर्ज १५ लाख रुपये होते. तसेच परदेशात शिक्षण घेणाऱ्यासाठी ४० लाखांपर्यंत कर्ज मिळणार आहे. याआधी हे कर्ज २५ लाखांपर्यंत मिळत होते. याशिवाय गृह कर्जात देखील वाढ करण्यात आली असून संचालक मंडळाकडून शेतकऱ्यांना देखील दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. बँकेने घेतलेल्या या निर्णयाचा मोठा फायदा विद्यार्थ्यांना होणार आहे.’



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *