पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने पीएच. डी. अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या प्रवेश फेरीचे आयोजन करण्यात आले आहे. या फेरी अंतर्गत विद्यार्थ्यांच्या मुलाखतीची प्रक्रिया ३ ते ३१ मे दरम्यान होणार आहे. पहिल्या प्रवेश फेरीत अपात्र ठरलेले, अनुपस्थित राहिलेले विद्यार्थी देखील पीएच. डी. प्रवेश प्रक्रियेच्या दुसऱ्या फेरीत सहभागी होऊ शकणार आहेत. काही दिवसांपासून रखडलेल्या पीएच.डी प्रवेश प्रक्रियेच्या दुसऱ्या फेरीचे सविस्तर वेळापत्रक विद्यापीठाच्या शैक्षणिक प्रवेश विभागाने प्रसिद्ध केले आहे.
पहिल्या फेरीतील पीएच.डी. अभ्यासक्रमासाठी भरलेल्या जागा विचारात घेऊन उर्वरित रिक्त जागा भरण्यासाठी तसेच नव्याने मिळालेल्या मान्यताप्राप्त पीएच. डी. मार्गदर्शकांना व पदोन्नतीने प्रवेशासाठी वाढलेल्या अधिकच्या जागा भरण्यासाठी दुसऱ्या प्रवेश फेरीचे आयोजन करण्यात येत आहे. यात पीएच.डी पदवीपूर्व परीक्षेत सवलत मिळालेले पात्र विद्यार्थी अर्ज करू शकणार आहेत. या सर्व विद्यार्थ्यांना २३ एप्रिल रोजी विद्यापीठ आणि संलग्नित संशोधन केंद्रावरील पीएच.डी.च्या दुसऱ्या फेरीसाठी उपलब्ध जागांचा तपशील विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल. सर्व पात्र विद्यार्थ्यांनी त्यांच्या लॉगिनमधून ऑनलाइन पद्धतीने विषयनिहाय, प्रवर्गनिहाय उपलब्ध जागांचा विचार करून ३० एप्रिलपर्यंत आवश्यकतेनुसार संशोधन केंद्र बदलण्याची कार्यवाही करायची आहे. केंद्र बदलण्याची प्रक्रिया केली नसल्यास प्रथम फेरीसाठी असलेले संशोधन केंद्रच दुसऱ्या फेरीसाठी कायम राहणार आहे. या प्रवेश प्रक्रियेबाबत विद्यापीठाने प्रसिद्ध केलेल्या वेळापत्रकास कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही, असे विद्यापीठाने परिपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.
महत्त्वाच्या तारखा
- मार्गदर्शकांनी रिक्त जागा अद्ययावत करणे : १७ एप्रिलपर्यंत
- संशोधन केंद्रांनी प्रवर्गनिहाय रिक्त जागांना मान्यता देणे : १८ ते २२ एप्रिल
- केंद्रनिहाय प्रवर्गनिहाय रिक्त जागांचा तपशील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन उपलब्ध करणे : २३ एप्रिल
- आवश्यकतेनुसार विद्यार्थ्यांनी संशोधन केंद्र बदलण्याची प्रक्रिया करणे : २३ ते ३० एप्रिल
- मुलाखत प्रक्रिया : ३ ते ३१ मे
विद्यार्थ्यांसाठी सूचना
- प्रथम फेरीस अपात्र ठरलेले, अनुपस्थित राहिलेले, तसेच पेट एक्झमटेड पात्र विद्यार्थी दुसऱ्या फेरीत सहभागी होऊ शकतात.
- विद्यार्थ्यांनी निवडलेल्या संशोधन केंद्रांच्या संपर्कात राहावे.
- दुसऱ्या प्रवेश फेरीसाठी उपलब्ध जागांचा तपशील विद्यापीठाच्या संकेतस्थळावर ‘पीएच.डी. ॲडमिशन २०२१’ या टॅबमध्ये उपलब्ध करून देण्यात येईल.
-
विद्यार्थ्यांनी त्यांच्या लॉगिनमधून ऑनलाइन पद्धतीने विषयनिहाय प्रवर्गनिहाय उपलब्ध जागांचा विचार करून ३० एप्रिलपर्यंत आवश्यकतेनुसार संशोधन केंद्र बदलण्याची कार्यवाही करावी.
शहर
- मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन १५ ऑगस्ट २०२७ रोजी धावणार; अवघ्या २ तासांत पार होणार प्रवास!
- एका युगाचा अंत! क्रिकेट विश्वाला धक्का, न्यूझीलंडचा दिग्गज केन विल्यमसनची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती!
- अमिताभ बच्चनही ज्याच्या प्रेमात! १०० वर्षांची परंपरा असलेला 'सोहन हलवा'; पाकिस्तानातून थेट 'बिग बीं'साठी स्पेशल पार्सल
- अमरावती एक्स्प्रेसमधील प्रवाशांना 'फटका' देणाऱ्या गँगचा पर्दाफाश! कल्याण लोहमार्ग पोलिसांकडून आरोपीला बेड्या
महाराष्ट्र
- मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन १५ ऑगस्ट २०२७ रोजी धावणार; अवघ्या २ तासांत पार होणार प्रवास!
- एका युगाचा अंत! क्रिकेट विश्वाला धक्का, न्यूझीलंडचा दिग्गज केन विल्यमसनची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती!
- अमिताभ बच्चनही ज्याच्या प्रेमात! १०० वर्षांची परंपरा असलेला 'सोहन हलवा'; पाकिस्तानातून थेट 'बिग बीं'साठी स्पेशल पार्सल
- अमरावती एक्स्प्रेसमधील प्रवाशांना 'फटका' देणाऱ्या गँगचा पर्दाफाश! कल्याण लोहमार्ग पोलिसांकडून आरोपीला बेड्या
गुन्हा
- हैदराबादमध्ये धक्कादायक घटना: प्रसिद्ध बॉडीबिल्डर आणि युट्युबर 'मसूद चांदी'ची मेहुण्याकडून निर्घृण हत्या!
- नागोद राजघराण्यात रक्तरंजित थरार: राजाच्या गर्लफ्रेंडने पत्नीवर झाडल्या गोळ्या; खळबळजनक घटना
- रायगड हादरले! आईने चार मुलांना विष पाजून स्वतःही संपवले आयुष्य; दोन मुलींचा मृत्यू, तर दोन मुलांची प्रकृती गंभीर!
- बँकॉकहून सायबर फसवणुकीचे जाळे! पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या कारवाईने मास्टरमाईंड सौरभ काळे गजाआड
राजकीय
- दादरमध्ये पांढऱ्या पट्ट्यांवरून नवा वाद: संदीप देशपांडेंचा आक्रमक पवित्रा, पालिकेला दिला ३ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम!
- ममता बॅनर्जींच्या अडचणीत वाढ! प्रक्षोभक भाषण आणि गृह मंत्रालयावर केलेल्या टिप्पणीवरून कोलकातामध्ये एफआयआर दाखल.
- स्मृती इराणींचे नाव मतदार यादीतून गायब! अमेठीत स्थानिक पंचायत निवडणुकीच्या यादीत नाव नसल्याने राजकीय वर्तुळात खळबळ.
- तृणमूल काँग्रेसच्या नेता रबीउल इस्लामची 'काळी' कृत्ये उघड; महिलांना त्रास देऊन बदनामी करण्याचे षड्यंत्र!
इतर
- आजचे राशिभविष्य १२ जून २०२६: 'या' राशींवर बरसणार धनलक्ष्मीची कृपा; जाणून घ्या तुमचे नशीब!
- आर्थिक राशिभविष्य ११ जून २०२६: कमला एकादशीच्या दिवशी या राशींवर बरसणार धन, मिळेल यश!
- आर्थिक राशिभविष्य १० जून २०२६: आयुष्मान योगाचा प्रभाव! वृषभ, मिथुन आणि कर्क राशीसाठी प्रगतीचे योग!
- एफडी (FD) धारकांसाठी मोठी बातमी! आता बँकांना दररोज जाहीर करावे लागणार व्याजदर; आरबीआयचा पारदर्शकतेवर भर
मनोरंजन
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
- 'आली लखाबाई' गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ; अमृता धोंगडेच्या रौद्र रूपाने आणि दमदार नृत्याने प्रेक्षकांना केले मंत्रमुग्ध.
- टीम इंडिया मुल्लांपूरमध्ये दाखल: अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्याची तयारी, गिलच्या सहभागावर प्रश्नचिन्ह!
देश विदेश
- नागोद राजघराण्यात रक्तरंजित थरार: राजाच्या गर्लफ्रेंडने पत्नीवर झाडल्या गोळ्या; खळबळजनक घटना
- बँकॉकहून सायबर फसवणुकीचे जाळे! पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या कारवाईने मास्टरमाईंड सौरभ काळे गजाआड
- आसाम: जोरहाट एअरबेसवर लँडिंगवेळी भारतीय वायुसेनेचे एएन-३२ विमान कोसळले; आग लागल्याने खळबळ
- सिंधुदुर्ग: प्रेमात डर्टी गेम! लग्नात अडसर ठरणाऱ्या प्रेयसीची प्रियकर शिक्षकाकडून निर्घृण हत्या

























Subscribe to my channel


