पुणे पालिकेच्या वाहनांना वाहतूक नियमांचे वावडे!

कोथरूड - कोथरूड कचरा डेपो येथे कचरा घेऊन येणाऱ्या वाहनांना नंबरप्लेट नसते, अनेक वाहनांची मुदत उलटून गेली आहे. या वाहनांवर महापालिकेने व वाहतूक पोलिसांनी (Police) कडक कायदेशीर कारवाई (Crime) करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

कोथरूड डेपो येथे राहणारे सुभाष आमले म्हणाले की, कचरा डेपो येथे येणारी वाहने येथील रस्त्यावर उभी असतात. त्यातून सांडणाऱ्या तेलामुळे येथील रस्ता निसरडा होतो, त्यामुळे दुचाकी वाहने घसरून अपघात होतात. त्यावर उपाययोजना करावी, अशी मागणी आम्ही वेळोवेळी केली आहे. तरीही काहीही होत नसल्याने मी कचरा डेपोत अधिकाऱ्यांना भेटायला गेलो असता तेथे असलेल्या बहुतांश वाहनांना नंबरप्लेटच नसल्याचे आढळले. अशा वाहनांमुळे अपघात घडल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार हा प्रश्न आहे.

श्रीरंग बोत्रे यांचे वडील कचऱ्याच्या भरधाव गाडीने धडक दिल्यामुळे मृत्युमुखी पडले होते. त्यावेळी अनुकंपा तत्त्वावर महापालिकेत कामावर घेण्यात येईल, असे आश्वासन बोत्रे कुटुंबीयांना देण्यात आले होते, परंतु त्याचे पालन अद्याप झाले नाही. याची आठवण देत बोत्रे म्हणाले की, नियमांचे पालन न करणाऱ्या यंत्रणेमुळे आम्ही आमचा कुटुंबप्रमुख गमावला. आता पुन्हा अशा घटना घडू नये म्हणून महापालिकेने योग्य ती खबरदारी घ्यायला हवी.

वाहतूक पोलिस निरिक्षक जयराम पायगुडे म्हणाले की, यापूर्वी अशा वाहनांवर कारवाई केली आहे. नियमबाह्य वाहनांवर कडक कारवाई केली जाईल.

या वाहनांचे फोटो पाहिल्यावर यातील बहुतांशी वाहने ही लगतच्या ग्रामपंचायत हद्दीतील आहेत. महापालिकेची वाहने यात दिसत नाहीत, परंतु नियमांचे पालन न करणाऱ्या वाहनांवर, संबंधितांवर वाहतूक पोलिसांनी कायदेशीर कारवाई करावी.

 


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply