पुणे : धायरीत टोळक्याची दहशत: वाहनांची तोडफोड ;वैमनस्यातून तरुणावर तीक्ष्ण शस्त्राने वार

पुणे : सिंहगड रस्ता परिसरातील धायरी भागात वैमनस्यातून टोळक्याने दहशत माजवून एका तरुणावर शस्त्राने वार केल्याची घटना घडली. टोळक्याने परिसरातील वाहनांची तोडफोड केली.या घटनेत गजानन राठोड (वय २९, रा. धायरी) जखमी झाला असून त्याने याबाबत सिंहगड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी टोळक्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राठोड धायरीतील चव्हाण आळीतून जात हाेता. त्या वेळी टाेळक्याने त्याला अडवले. टाेळक्यातील एका आरोपीशी राठोडची भांडणे झाली होती. वादातून टोळक्याने राठोडवर हल्ला चढविला. त्याच्यावर कोयत्याने वार केले. परिसरातील दुचाकींची तोडफोड करुन टोळके पसार झाले. पोलीस उपनिरीक्षक चेतन थोरबोले तपास करत आहेत.

 



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *