पुणे : देशातील प्रमुख शहरे किती सुरक्षित? पुणे देशातील दुसऱ्या क्रमांकाचे सुरक्षित शहर,

पुणे : कायदा-सुव्यवस्था तसेच गंभीर गुन्हे घडण्याचे प्रमाण विचारात घेता पुणे देशातील दुसऱ्या क्रमांकाचे सुरक्षित ठरले आहे. राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाच्या (एनसीआरबी) अहवालात पुणे शहर ज्येष्ठ नागरिक, नोकरदार महिलांसाठी सुरक्षित असल्याचे नमूद करण्यात आले आहे. एक लाख लोकसंख्येच्या तुलनेत सर्वांत कमी गुन्हे घडत असल्यामुळे एनसीआरबीसीच्या यादीत कोलकाता हे सुरक्षित शहरांच्या यादीत पहिल्या, तर मुंबई सहाव्या स्थानावर आहे

‘एनसीआरबी’च्या अहवालानुसार २०२१ मध्ये पुणे देशातील दुसऱ्या क्रमांकाचे शहर ठरले आहे. या अहवालात कोलकाता हे देशातील पहिले क्रमांकाचे सुरक्षित शहर असल्याचे म्हटले आहे. कोलकात्यात दखलपात्र गुन्ह्यांची (काॅग्निजिबल ऑफेन्स) संख्या प्रतिलाख लोकसंख्येमागे १०३.४ टक्के आहे. दुसऱ्या क्रमांकावर पुणे शहर असून एक लाख लोकसंख्येमागे गु्न्ह्यांची संख्या २५६.८ आहे. हैदराबाद देशातील तिसऱ्या क्रमांकाचे सुरक्षित शहर आहे. तेथील गुन्ह्यांची संख्या २५९.९ एवढी आहे. पुणे पोलिसांनी गेल्या काही वर्षांपासून महिला, महाविद्यालयीन तरुणी तसेच ज्येष्ठ नागरिकाच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे.

ज्येष्ठ नागरिक, महिला तसेच महाविद्यालयीन तरुणी, शाळकरी मुलींसाठी बडी काॅप, पोलीस काका, पोलीस दीदी, दामिनी पथक अशा योजना राबविण्यात आल्या आहेत. ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलिसांकडून स्वतंत्र कक्ष सुरू करण्यात आला असून शहरातील ज्येष्ठ नागरिक संघाच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांची नोंदणी करण्यात आली आहे. महिला, विद्यार्थिनी तसेच ज्येष्ठ नागरिकांच्या तक्रारी आल्यास त्वरित सोडविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी शहरातील संघटित गुन्हेगारीचा बीमोड करण्यासाठी गुंड टोळ्यांच्या विरोधात कारवाई केली आहे. सराइतांच्या विरोधात सातत्याने प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आल्याने गुंडांना चाप बसला आहे. महिला, विद्यार्थिनी तसेच ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षितेतस सर्वोच्च प्राधान्य देऊन त्यांच्या समस्या सोडविण्याचे आदेश पोलीस आयुक्त गुप्ता यांनी दिले आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply