पुणे : देशभरातील केंद्रीय विद्यापीठांच्या प्रवेश परीक्षांची घोषणा

पुणे : देशभरातील केंद्रीय विद्यापीठांच्या पदवी अभ्यासक्रमांसाठी सामाईक विद्यापीठ प्रवेश परीक्षेची (सीयुईटी) घोषणा करण्यात आली आहे. शैक्षणिक वर्ष २०२२-२३ साठीच्या या प्रवेश परीक्षेला अर्ज भरण्याची अंतिम मुदत ६ मे २०२२पर्यंत आहे.

विविध राज्यांत स्थित केंद्रीय विद्यापीठात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही राष्ट्रीय स्तरावरील प्रवेश परीक्षा आयोजित करण्यात येते. नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या वतीने ही परीक्षा घेण्यात येत असून, राज्यातील सर्वच विद्यार्थ्यांना केंद्रीय विद्यापीठांत प्रवेशासाठी सामाईक संधी प्राप्त झाली आहे. इंग्रजी, हिंदी, मराठीसह १३ भाषांमध्ये ही परीक्षा पार पडणार आहे. परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक असून, ही परीक्षा संगणकावर पार पडणार आहे.

परीक्षेविषयी महत्त्वाचे

  • परीक्षेची तारीख : जुलैचा पहिला किंवा दुसरा आठवडा
  • पद्धत : संगणकावर बहू पर्यायी प्रश्नोत्तर
  • देशभरातील परीक्षा केंद्रे : १५७
  • देशाबाहेरील परीक्षा केंद्रे : १३
  • संकेतस्थळ :https://cuet.samarth.ac.in/



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply