पुणे : दूध वाढीसाठी ऑक्सिटोसीनचा वापर करणाऱ्या पुणे, पिंपरीतील सहा गोठे मालक अटकेत; गुन्हे शाखेची कारवाई

पुणे : गाई, म्हशींचे दूध वाढविण्यासाठी ऑक्सिटोसीन ओैषधाचा वापर करणाऱ्या गोठे मालकांच्या विरोधात पुणे पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. पुणे, पिंपरीतील सहा गोठे मालकांना गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली. गोठे मालकांनी ऑक्सिटोसीन ओैषधाचा वापर गाई, म्हशींचे दूध वाढविण्यासाठी केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

विठ्ठल भिवाजी झिंजुर्डे (वय ४८, झिंजुर्डे मळा, पिंपळे सौदागर), सागर कैलास सस्ते (वय ३५, रा. सस्ते मळा, आळंदी रस्ता, मोशी),विलास महादेव मुरकुटे (वय ५७, रा. मारुंजी, ता. मुळशी, जि. पुणे), सुनील खंडप्पा मलकुनाईक (वय ५१, रा. हरेकृष्णा पार्क, टिंगरेनगर, धानोरी रस्ता), गणेश शंकर पैलवान (वय ५०, रा. डायस प्लाॅट, गुलटेकडी), महादू नामदेव परांडे (वय ५१, रा. दिघी, आळंदी रस्ता) अशी अटक करण्यात आलेल्या गोठे मालकांची नावे आहेत.

गाई, म्हशींचे दूध वाढविण्यासाठी बेकायदा ऑक्सिटोसीन ओैषधाची विक्री करणाऱ्या पश्चिम बंगालमधील टोळीला गुन्हे शाखेने सहा जणांना नुकतीच अटक केली होती. पुणे, पिंपरीतील गोठे मालक गाई, म्हशींचे दूध वाढीसाठी ऑक्सिटोसीन ओैषधाचा वापर करत असल्याची माहिती अमली पदार्थ विरोधी पथकाला तपासात मिळाली होती. त्यानंतर गोठे मालक झिंजुर्डे, सस्ते, मुरकुटे, मलकुनाईक, पैलवान, परांडे यांना अटक करण्यात आली. पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहायक आयुक्त गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड, सहायक निरीक्षक लक्ष्मण ढेंगळे, सुजीत वाडेकर, पांडुरंग पवार, मारुती फारधी, प्रवीण उत्तेकर, मारुती पारधी आदींनी ही कारवाई केली.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply