
पुणे : पहिल्या पत्नीशी घटस्फोटानंतर झाल्यानंतर त्याने दुसरा विवाह केला. पण, दुसऱ्या पत्नीचे विवाहबाह्य संबंध उघडकीस आले. त्याबाबत जाब विचारला असता दिलेल्या मानसिक त्रासातून पतीने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने शर्टच्या कॉलरमध्ये चिठ्ठी लिहून ठेवल्याने हा प्रकार उघडकीस आला.
किरण जाधव (वय ४७, रा. कल्याणीनगर) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी त्यांच्या पहिल्या पत्नीच्या मुलीने येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून पोलिसांनी त्यांची दुसरी पत्नी गीता, तिचा प्रियकर व त्यांच्या दोन नातेवाईकांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार २०१९ ते ४ ऑक्टोबर २०२२ दरम्यान घडला.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किरण जाधव यांचा पहिल्या पत्नीबरोबर घटस्फोट झाला होता. त्यानंतर त्यांनी गीता हिच्याशी विवाह केला. काही दिवसांनी त्यांच्या दुसऱ्या पत्नीचे कुलदीप नावाच्या तरुणाबरोबर विवाहबाह्य संबंध असल्याचे समजले. त्याचा त्यांनी जाब विचारल्यावर पत्नीने त्याची कबुली दिली. मात्र, त्यानंतर तिने प्रियकराबरोबर उघडपणे संबंध कायम ठेवले. तिचे काही नातलगही नातेवाईकही तिला साथ देत होते. त्याचप्रमाणे वारंवार त्यांच्या घरी येऊन पैसे उकळत होते. या सर्वाचा मानसिक त्रास होत असल्याने किरण जाधव यांनी राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. आत्महत्यापूर्वी त्यांनी दुसरी पत्नी, तिचा प्रियकर आणि काही नातेवाईकाविरुद्ध तक्रार अर्ज लिहला. तो अर्ज शर्टच्या कॉलरला लावून नंतर आत्महत्या केली.या प्रकरणात येरवडा पोलिसांनी सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. मात्र, चिठ्ठीतील मजकुराच्या तपासावरून गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक स्वप्नाली गायकवाड याबाबत अधिक तपास करीत आहेत.
शहर
- मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन १५ ऑगस्ट २०२७ रोजी धावणार; अवघ्या २ तासांत पार होणार प्रवास!
- एका युगाचा अंत! क्रिकेट विश्वाला धक्का, न्यूझीलंडचा दिग्गज केन विल्यमसनची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती!
- अमिताभ बच्चनही ज्याच्या प्रेमात! १०० वर्षांची परंपरा असलेला 'सोहन हलवा'; पाकिस्तानातून थेट 'बिग बीं'साठी स्पेशल पार्सल
- अमरावती एक्स्प्रेसमधील प्रवाशांना 'फटका' देणाऱ्या गँगचा पर्दाफाश! कल्याण लोहमार्ग पोलिसांकडून आरोपीला बेड्या
महाराष्ट्र
- मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन १५ ऑगस्ट २०२७ रोजी धावणार; अवघ्या २ तासांत पार होणार प्रवास!
- एका युगाचा अंत! क्रिकेट विश्वाला धक्का, न्यूझीलंडचा दिग्गज केन विल्यमसनची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती!
- अमिताभ बच्चनही ज्याच्या प्रेमात! १०० वर्षांची परंपरा असलेला 'सोहन हलवा'; पाकिस्तानातून थेट 'बिग बीं'साठी स्पेशल पार्सल
- अमरावती एक्स्प्रेसमधील प्रवाशांना 'फटका' देणाऱ्या गँगचा पर्दाफाश! कल्याण लोहमार्ग पोलिसांकडून आरोपीला बेड्या
गुन्हा
- हैदराबादमध्ये धक्कादायक घटना: प्रसिद्ध बॉडीबिल्डर आणि युट्युबर 'मसूद चांदी'ची मेहुण्याकडून निर्घृण हत्या!
- नागोद राजघराण्यात रक्तरंजित थरार: राजाच्या गर्लफ्रेंडने पत्नीवर झाडल्या गोळ्या; खळबळजनक घटना
- रायगड हादरले! आईने चार मुलांना विष पाजून स्वतःही संपवले आयुष्य; दोन मुलींचा मृत्यू, तर दोन मुलांची प्रकृती गंभीर!
- बँकॉकहून सायबर फसवणुकीचे जाळे! पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या कारवाईने मास्टरमाईंड सौरभ काळे गजाआड
राजकीय
- दादरमध्ये पांढऱ्या पट्ट्यांवरून नवा वाद: संदीप देशपांडेंचा आक्रमक पवित्रा, पालिकेला दिला ३ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम!
- ममता बॅनर्जींच्या अडचणीत वाढ! प्रक्षोभक भाषण आणि गृह मंत्रालयावर केलेल्या टिप्पणीवरून कोलकातामध्ये एफआयआर दाखल.
- स्मृती इराणींचे नाव मतदार यादीतून गायब! अमेठीत स्थानिक पंचायत निवडणुकीच्या यादीत नाव नसल्याने राजकीय वर्तुळात खळबळ.
- तृणमूल काँग्रेसच्या नेता रबीउल इस्लामची 'काळी' कृत्ये उघड; महिलांना त्रास देऊन बदनामी करण्याचे षड्यंत्र!
इतर
- आजचे राशिभविष्य १२ जून २०२६: 'या' राशींवर बरसणार धनलक्ष्मीची कृपा; जाणून घ्या तुमचे नशीब!
- आर्थिक राशिभविष्य ११ जून २०२६: कमला एकादशीच्या दिवशी या राशींवर बरसणार धन, मिळेल यश!
- आर्थिक राशिभविष्य १० जून २०२६: आयुष्मान योगाचा प्रभाव! वृषभ, मिथुन आणि कर्क राशीसाठी प्रगतीचे योग!
- एफडी (FD) धारकांसाठी मोठी बातमी! आता बँकांना दररोज जाहीर करावे लागणार व्याजदर; आरबीआयचा पारदर्शकतेवर भर
मनोरंजन
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
- 'आली लखाबाई' गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ; अमृता धोंगडेच्या रौद्र रूपाने आणि दमदार नृत्याने प्रेक्षकांना केले मंत्रमुग्ध.
- टीम इंडिया मुल्लांपूरमध्ये दाखल: अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्याची तयारी, गिलच्या सहभागावर प्रश्नचिन्ह!
देश विदेश
- नागोद राजघराण्यात रक्तरंजित थरार: राजाच्या गर्लफ्रेंडने पत्नीवर झाडल्या गोळ्या; खळबळजनक घटना
- बँकॉकहून सायबर फसवणुकीचे जाळे! पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या कारवाईने मास्टरमाईंड सौरभ काळे गजाआड
- आसाम: जोरहाट एअरबेसवर लँडिंगवेळी भारतीय वायुसेनेचे एएन-३२ विमान कोसळले; आग लागल्याने खळबळ
- सिंधुदुर्ग: प्रेमात डर्टी गेम! लग्नात अडसर ठरणाऱ्या प्रेयसीची प्रियकर शिक्षकाकडून निर्घृण हत्या

























Subscribe to my channel


