पुणे :दहावीच्या बनावट प्रमाणपत्राच्या आधारे टपाल खात्यात नोकरी; दीड महिन्यांच्या नोकरीनंतर फसवणुकीचा प्रकार उघडकीस

पुणे : भारतीय टपाल खात्यात (पोस्ट) ‘ग्रामीण डाक सेवक’ पदाची नोकरी मिळविण्यासाठी दहावीचे बनावट प्रमाणपत्र सादर केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी स्वारगेट पोलिसांनी एका तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. या तरुणाने नियुक्ती मिळवून दीड महिना नोकरी केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.

वैजनाथ मल्लिकार्जून कुंभार (वय. २५, रा. अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत टपाल खात्यातील अधिकारी योगेश नानासाहेब वीर (वय. ४१,रा. घोरपडी पेठ) यांनी फिर्याद दिली आहे. कुंभार याने बनावट प्रमाणपत्र सादर करून नियुक्ती पत्र मिळवले होते. त्यानंतर त्याने मार्केटयार्ड गुलटेकडी येथील टपाल कार्यालयात दीड महिने नोकरीही केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुंभार हा भारतीय टपाल खात्यातील पुणे शहर पूर्व विभागातील मार्केटयार्ड टपाल कार्यालयात ग्रामीण डाक सेवक पदावर नोकरी लागाल होता. त्यासाठी त्याने पात्रतेच्या निकषानुसार कागदपत्रे सादर केली होती. दरम्यान ही सर्व कागदपत्रे पडताळणीसाठी मुख्य कार्यालयात पाठविण्यात आली होती. त्यावेळी त्यातील दहावी बोर्डाचे प्रमाणपत्र बनावट असल्याचे समोर आले.

त्यानुसार येथील कार्यालयातील अधिकाऱ्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला होता. संबंधित अर्जाची चौकशी केल्यानंतर टपाल खात्याची दिशाभूल करून फसवणूक करत नोकरी मिळवल्याप्रकरणी पोलिसांनी कुंभार याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक भोसले करीत आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply