पुणे : दरोड्याच्या तयारीत असलेल्या दरोडेखोरांना हिंजवडी पोलिसांनी ठोकल्या बेड्या

पुण्यातील आयटी हब असणाऱ्या हिंजवडीतील पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याचा तयारीत असलेल्या पाच दरोडेखोरांना हिंजवडी पोलिसांनी गजाआड केलं आहे. त्यांच्याकडून एक कोयता, दोन गावठी पिस्तुल, दोन जिवंत काडतुसे आणि मिर्ची पूड पोलिसांनी जप्त केली आहे. या प्रकरणी पाच जणांना हिंजवडी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.  अनिकेत उर्फ मोण्या अनिल शिंदे (वय- २०), अविनाश घनश्याम पवार (वय- २०), इस्माल करीम शेख (वय- २०), रामेश्वर साहेबराव तोगरे (वय- २०), सूरज निरंजन पवार (वय- २१) अशी अटक केलेल्या दरोड्याखोरांची नाव आहेत. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घोटावडे मान रोडवर असणाऱ्या बापूजी मंदिराजवळ काही व्यक्ती सशस्त्र दरोडा टाकण्याचा तयारीत असल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक राम गोमारे यांना मिळाली होती. त्यानुसार, वरिष्ठ पोलिस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक तयार करण्यात आलं. बापूजी मंदिराच्या काही अंतरावर वाहन लावून पोलिसांनी आरोपींना कळायच्या आत पकडले. संबंधित दरोडेखोर हे सराईत गुन्हेगार आहेत. आयटी हब असणाऱ्या हिंजवडीमधील फेज दोन येथील भारत पेट्रोल पंपावर ते दरोडा टाकण्याची तयारी करत असल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झाल आहे. आरोपीकडून कोयता, दोन गावठी पिस्तुल, दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply